मनोरंजन

Chhaava Release Date: स्वराज्याचे 'धाकले धनी'! "या" दिवशी येणार छावा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या तारिख

विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे विकी. जाणून घ्या चित्रपटाची रिलीज तारीख.

Published by : Team Lokshahi

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा त्याच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो. त्यातच आता विकी कौशल बहुप्रतिक्षीत चित्रपट "छावा" या चित्रपटाद्वारे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटांचा ट्रेलर २२ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे निर्मिते दिनेश विजन तर चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. प्रत्येक मराठ्याच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मान, सन्मान आणि आदर आहे. त्यांच्या कर्तृत्वाची किमया जगभरात गाजलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर 'धाकले धनी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांची जीवनगाधा आणि त्यांनी दिलेले आपले त्याग याबद्दल बोलायचं झाल तर अंगावर काटा येतो.

22 जानेवारीला रिलीज होणार ट्रेलर

"छावा" चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज झाले त्यावेळी निर्मात्यांनी ट्रेलरची अपडेट सांगितली आहे. अभिनेत्याचा लुक पहिल्यानंतर चाहते देखील या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत होते. मात्र आता त्यांच्या प्रतिक्षेला पुर्णविराम लागला असून प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली आहे. पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये निर्मात्यांनी म्हटले आहे की, 16 जानेवारी 1681 रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. या दिनाचं औचित्य साधत 344 वर्षांनंतर आपण त्यांच्या शौर्याची आणि पराक्रमाची कहाणी सांगणार आहोत. असे म्हणत सोशल मीडियावर या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे, दरम्यान या चित्रपटाबद्दल चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

अभिनेता विकी कौशलचा आगामी चित्रपट 'छावा' हा ६ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु काही कारणास्तव चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही, पण अखेर चित्रपटाची तारीख ठरली आहे. ४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 19 फेब्रुवारीच्या आधी रिलीज होत असल्यामुळे या ऐतिहासिक गाथेचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर आणि रिलीजबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Monorail : मुंबईची मोनोरेल काही काळ राहणार बंद; तांत्रिक बिघाडावर तोडगा काढण्यासाठी निर्णय

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आईसोबतच्या आठवणींना उजाळा दिला,म्हणाले...

PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस; डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन करुन दिल्या शुभेच्छा

Latest Marathi News Update live : आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन