Chotya Bayochi Motthi Swapna  team lokshahi
मनोरंजन

Chotya Bayochi Motthi Swapna : 'ही' अभिनेत्री साकारणार बयोची भूमिका

'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' मालिकेने घेतला काही काळाचा लीप

Published by : Team Lokshahi

शिक्षणासाठीची जिद्द आणि स्वप्नांची ओढ, असा वेगळा विषय हाताळत ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’या मालिकेत बयोचा शिक्षणासाठीच्या जिद्दीचा अनोखा प्रवास या मालिकेत आपल्याला पाहायला मिळतो आहे. भरपूर अभ्यास करून डॉक्टर व्हायचं स्वप्न बघणारी बयो ह्या विषयावर आधारित असलेली ही मालिका आहे.

आपल्या आईची साथ सुटल्यानंतर बयो आता वडिलांसोबत पुढची वाटचाल कशी करेल, हे मालिकेतून पाहता येईल. पण आता मालिका काही काळाचा अवधी घेऊन पुढे सरकणार आहे. बयो आता मोठी झालेली दिसणार आहे. ती आता मुंबईमध्ये दाखल झाली असून मुंबईतील विज्ञान महाविद्यालयामध्ये शिकायला येणार आहे.

आता बयोच्या भूमिकेत अभिनेत्री विजया बाबर ही गुणी अभिनेत्री दिसणार आहे. आता ही मालिका काही वर्षांचा लीप घेत असून छोटी बयो मोठी होणार आहे. त्यामुळे मालिकेच्या कथानकाला सुद्धा वळण आलेले पाहायला मिळेल.

बयो मुंबईमध्ये आल्यावर मुंबईच्या वेगाशी कसं जुळवून घेते, हे आता मालिकेतून पाहायला मिळेल. मुंबई- कोकणात राहणारी सर्वसामान्य मुलगी डॉक्टर होण्याचे स्वप्न मनी बाळगते आणि त्या दिशेने आपली वाटचाल करते. तिच्या या खडतर प्रवासात अनेक काटे येतात. पण त्यावरही मात करून ती पुढे जात असते. ही गोष्ट आहे सोनी मराठी वाहिनीवरील छोट्या वयाची मोठी स्वप्न या मालिकेतील आहे.

बयोबरोबरचे इतर कलाकारही नवीन असणार आहेत. ईराच्या भूमिकेत अभिनेत्री रुचा गायकवाड पाहायला मिळणार आहे. त्याबरोबरच ओजस मराठे हा अभिनेताही असणार आहे. आता मेडिकल कॉलेजमध्ये बयो कशा प्रकारे अभ्यास करेल आणि मुंबईत येऊन ती इथल्या वातावरणाशी कसं जुळवून घेईल आणि डॉक्टर व्हायचं तिचं स्वप्न कसं पूर्ण करेल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

मालिकेत आता मोठी झालेली बयो दिसणार आहे आणि आता बयोच्या आयुष्यातलं हे वळण तिला पुढे कसं मदत करेल, हे पाहायला मिळेल. कोकणातून आलेली बयो मुंबईमध्ये बागडताना दिसेल. आता तिच्या विश्वातून बाहेर येऊन ती आयुष्याच्या या वळणावर येणाऱ्या अडथळ्यांना कशा प्रकारे सामोरी जाईल हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. बयोचं डॉक्टर व्हायचं स्वप्न कसं पूर्ण होणार, हे पाहणं उत्सुकतेचं असेल. पाहायला विसरू नका, 'छोट्या बयोची मोठी स्वप्नं', सोम. ते शनि. रात्री ८.३० वा. सोनी मराठी वाहिनीवर.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा