मनोरंजन

'क्लब 52' चित्रपटाचा धडाकेबाज ट्रेलर लाँच; हार्दिक जोशींची दमदार भूमिका

अभिनेता हार्दिक जोशीची अॅक्शनपॅक्ड भूमिका असलेल्या "क्लब 52" या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अभिनेता हार्दिक जोशीची अॅक्शनपॅक्ड भूमिका असलेल्या "क्लब 52" या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत "क्लब 52" या चित्रपटाची निर्मिती वैशाली ठाकूर यांनी केली आहे. अमित वाल्मिक कोळी दिग्दर्शित या चित्रपटात दमदार स्टारकास्ट आणि मनोरंजक कथानक असून हा चित्रपट १५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

बजरंग बादशाह यांच्या कथेवर राकेश शिर्के यांनी पटकथा आणि संवादलेखन केले आहे. कौशल गोस्वामी यांनी छायांकन, करण आणि दर्शन यांनी संगीत, अजय वाघमारे, बजरंग बादशाह, सुजाता पवार यांनी गीतलेखन, आदित्य बेडेकर यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात हार्दिक जोशी, भाऊ कदम, शशांक शेंडे, भरत ठाकूर, यशश्री व्यंकटेश , टीना सोनी, राधा सागर, नितीन रुपनवार, उमेश बोलके अशी तगडी स्टारकास्ट आहे.

'क्लब 52' या चित्रपटाची एक डाव नियतीचा अशी टॅगलाईन आहे. कसिनो आणि त्याच्याशी संबंधित कथानक असल्याचं ट्रेलरवरून दिसून येतं. चित्रपटात अॅक्शनची भरमार आहे, शिवाय संवादही खटकेबाज आहेत. काही नवोदित कलाकार असूनही त्यांचा अभिनय उत्तम झाल्याचा दिसतो आहे. चित्रपटाचं पोस्टर आणि टीजरमुळे या चित्रपटानं आधीच उत्सुकता निर्माण केली आहे. त्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी आता केवळ १५ डिसेंबरपर्यंत थांबावे लागणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच