Ranbir Kapoor Lokshahi Team
मनोरंजन

Ranbir Kapoor : 'शमशेरा'बद्दल मत व्यक्त करत रणबीर म्हणाला...

रणबीरसाठी ही एक मनोरंजक व अद्भुत अशी भूमिका होती.

Published by : prashantpawar1

रणबीर कपूर(Ranbir Kapoor) प्रथमच चित्रपटाच्या पडद्यावर दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. रणबीरचे चाहते त्याला या लूकमध्ये पाहण्यासाठी फार उत्सुक आहेत. रणबीर कपूरने सांगितले की, ज्याक्षणी मला चित्रपटाबद्दल सांगण्यात आले तेव्हा मला दुहेरी भूमिकेसाठी ऑफर देण्यात आली नव्हती. परंतु जेव्हा मी चित्रपटाचं कथानक त्याक्षणी मी लगेचच आदित्य चोप्रा(Aditya Chopra) आणि करण मल्होत्रा(Karan Malhotra) ​​यांना माझी प्रतिक्रिया दिली.

मला शमशेराची भूमिका द करू द्या कारण ही भूमिका खूप चांगली आहे. रणबीरसाठी ही एक मनोरंजक व अद्भुत अशी भूमिका आहे. रणबीर कपूर पुढे म्हणाला 'या भूमिकेसाठी मला खरंच आदित्य आणि करणला सांगायचं होतं. मला वाटतं की त्यानंतर करणने काही लूक टेस्ट केले असावेत आणि तेव्हाच तो मला ही भूमिका देण्याबाबत पूर्ण खात्री पटली. सुरुवातीला मला या भूमिकेची ऑफर दिली गेली नव्हती. परंतु एक अभिनेता म्हणून मला चांगले बंधनात बांधले गेले. ती दोन अनोखी पात्रे होती आणि माझ्यासारख्या कलाकाराला ते पात्र साकारणं आणि ते वेगळं करणं हे खूप आव्हानात्मक आणि रोमांचक होतं.

'शमशेरा' ही एका अशा व्यक्तीची कथा आहे जो एक वयक्ति गुलाम बनतो आणि नंतर त्याच्या गोत्राचे रक्षण करण्यासाठी नेता निवडला जातो. या चित्रपटात वाणी कपूर एका डान्सिंग सोनाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर संजय दत्त(Sanjay Datt) इन्स्पेक्टर शुद्ध सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि संजय दत्त आमनेसामने दिसणार आहेत. या हिंदी चित्रपटाव्यतिरिक्त 22 जुलै रोजी तमिळ आणि तेलुगू भाषेतील सिनेमागृहात देखील हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की 'शमशेरा' नंतर रणबीर कपूर अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे. ज्यामध्ये त्याची जोडी आलिया भट्टसोबत दिसणार आहे. 'शमशेरा' रिलीज झाल्यानंतर लवकरच रणबीर या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा