मनोरंजन

'ते' विधान भोवलं! रणबीर कपूर विरोधात पोलिसांत तक्रार दाखल

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि कुटुंबियांविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ख्रिसमस साजरी करतांना धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Published by : Team Lokshahi

बॉलिवूडमधील कपूर कुटुंबिय एकत्र येऊन दरवर्षी ख्रिसमस साजरा करतात. यावर्षीदेखील आलिया भट्टसह संपूर्ण कपूर कुटुंब ख्रिसमस पार्टीसाठी एकत्र आले होते. यादरम्यानचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. परंतु, या व्हिडीओमुळे रणबीर कपूर आता अडचणीत सापडला आहे.

या व्हिडीओमध्ये केकवर एक व्यक्तीे वाईन ओतताना दिसत आहे. वाईन ओतल्यानंतर रणबीरने त्याच केकला आग लावली. यादरम्यान रणबीरने 'जय माता दी' असे बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी प्रचंड भडकले आहेत. या व्हिडीओमुळे भावना दुखावल्याचं म्हणत अनेकांनी आक्षेप घेतला आहे. इतकेच नाही तर, एका व्यक्तीने रणबीर आणि संपूर्ण कपूर कुटुंबाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

माहितीनुसार, संजय तिवारी नावाच्या व्यक्तीने घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रणबीर वाईन ओतताना 'जय माता दी' म्हटल्यामुळे देवी-देवतांचा अपमान झाल्याची तक्रार संजय तिवारी नावाच्या व्यक्तीने केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा