मनोरंजन

Mithun Chakraborty: मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

ज्या अभिनेत्याने 70 आणि 90 च्या दशकात स्वतःच्या करिअरची सुरुवात केली अशा नायकाला दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला जाणार आहे.

Published by : Team Lokshahi

भारतीय चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती ज्यांना मिथुन दादा असं देखील ओळखले जाते. ज्या अभिनेत्याने 70 आणि 90 च्या दशकात स्वतःच्या करिअरची सुरुवात केली अशा नायकाला दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला जाणार आहे. मिथुन चक्रवर्ती यांनी 70 आणि 90 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे त्यांच्या डिस्को डान्सर, अग्निपथ, गुरु, मृगया या चित्रपटांमधून त्यांनी तेव्हाचा काळ गाजवला होता. त्यांना आता दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर होणार आहे.

दादासाहेब फाळके राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा झालेली आहे अभिनेता मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांचा सन्मान केला जाणार आहे. तर 8 ऑक्टोबरला दिल्लीमध्ये हा पुरस्कार होणार असून या पुरस्कार सोहळ्यामध्ये हे सर्व पुरस्कार दिले जाणार आहेत. दादासाहेब फाळके राष्ट्रीय पुरस्कार जे मानाचे पुरस्कार म्हणून मानले जातात, या पुरस्कारांची घोषणा झाली असून या पुरस्काराचे मानकरी बॉलिवूडमधील अभिनेते मिथुन चक्रवर्ती हे झाले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा