Dadasaheb Phalke Lokshahi Team
मनोरंजन

दादासाहेब फाळके; महिलांना प्रथमच दिले होते चित्रपटात स्थान

चित्रपटात महिलांना स्थान देणारे पहिले दिग्दर्शक हे दादासाहेब फाळके आहेत.

Published by : prashantpawar1

भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके ( Dadasaheb Phalke ) यांनी चित्रपटाचा शोध लावला. इ.स मध्ये पहिला मुकपट राजा हरिश्चंद्र (Raja Harishchandra)प्रदर्शित झाला. हा मुकपट खऱ्या अर्थाने भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया मानला जातो. जिथून भारतीय चित्रपट सृष्टीचा जन्म झाला. चित्रपट (movies) सृष्टीत अभूतपूर्व यश संपादन करणाऱ्या चित्रपटांना दादासाहेब फाळके हा पुरस्कार प्रदान केला जातो. या मानांकन म्हणजे १० लाख रोख रक्कमेसह सुवर्ण कमळ व शाल असा यात समावेश आहे.

दादासाहेब फाळके यांचे संपूर्ण नाव धुंडिराज गोविंद फाळके असे आहे. त्यांचा जन्म ३० एप्रिल १८७० रोजी महाराष्ट्रातील त्र्यंबक येथे झाला. भारतीय चित्रपट सृष्टीचा मजबूत असा पाया म्हणजेच दादासाहेब फाळके.चित्रपटांचा जन्मदाता असणाऱ्या या दादासाहेबांनी चित्रपटसृष्टीत बहुमूल्य योगदान प्रदान करून आपल्या कार्याची प्रतिमा उंचावलेली आहे.

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार दादासाहेब फाळके हे चित्रपट सृष्टीत महिलांना काम देणारे पहिले दिग्दर्शक आहे असे समजले जाते. त्यांच्या मनात स्त्रियांबद्दल प्रचंड आदर होता. स्त्रियाच आपल्या जीवनातील अनुभवातून त्यांच्या काही प्रश्नांना अगदी सोप्या पद्धतीने चित्रपटांद्वारे मांडू शकतील, असं देखील त्यांनी म्हटलं होतं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी