मनोरंजन

प्रभासच्या आदिपुरूष चित्रपटाची डेट रिलीज ; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Published by : Team Lokshahi

गेली अनेक दिवस अभिनेता प्रभासच्या (Prabhas) आदिपुरूष (Adipurush) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहात आहेत. या चित्रपटाची नुकतीच रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. अभिनेत्री कृती सेनन हिने (Kriti Sanon) नुकतीच या चित्रपटाबद्दलची एक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

महाशिवरात्रीच्या शुभदिवशी या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट (12 जानेवारी 2023) ला 3D स्वरूपमध्ये प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री कृती सेनने (Kriti Sanon) हिने तिच्या इन्स्टाग्रामवर आदिपुरूष चित्रपटाच्या पोस्टरचा फोटो शेअर केला आहे.

तिने या फोटोला कॅप्शन देताना म्हणाली की, आदिपुरूष हा चित्रपट जगभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये 12 जानेवारी2023ला 3D स्वरूप प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आदिपुरूष चित्रपटामध्ये मुख्ये भुमिकेत कृती सेनन, प्रभास, सनी सिंह (Sunny Singh) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) हे कलाकार दिसणार आहेत. तर हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलगू , मल्याळम आणि कन्नड या अनेक भाषेमध्ये (Languages) प्रदर्शित होणार आहे. तसेच भूषण कुमार, ओम राऊत, प्रसाद सुतार, कृष्ण कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड

The sound of Breaking Fingers : बोटे मोडल्याने आवाज कसा येतो माहीत आहे का? नसेल माहित जाणून घ्या...

Ind Vs Eng : हेझलवूडचा 'तो' सल्ला ऐकला अन् आकाश दीपने इंग्लंडचा फडशा पाडला

Asia Cup : भारत सरकारची पाकिस्तानच्या हॉकी संघाला आशिया चषकासाठी परवानगी