मनोरंजन

उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी; एकाला अटक

अभिनेत्री आणि सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद अनेकदा तिच्या अनोख्या पोशाखांमुळे चर्चेत असते. परंतु, यामुळेच उर्फी अनेकदा अडचणीत सापडते.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री आणि सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद अनेकदा तिच्या अनोख्या पोशाखांमुळे चर्चेत असते. परंतु, यामुळेच उर्फी अनेकदा अडचणीत सापडते. अभिनेत्रीला तिच्या फोनवर एका अज्ञात व्यक्तीकडून बलात्कार आणि हत्येची धमकी दिली आहे. याप्रकरणी उर्फीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. याची पोलिसांनी दखल घेत आरोपीला अटक केली आहे.

उर्फी जावेदला तिच्या फोनवर एका अज्ञात व्यक्तीकडून बलात्कार आणि हत्येची धमकी दिली. त्यानंतर उर्फीने तक्रार दाखल केली असता पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. नवीन गिरी असे आरोपीचे नाव असून तो मूळचा बिहारचा आहे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी नवीन गिरी उर्फी जावेदला धमकावण्यासाठी प्रत्येक वेळी नवीन नंबर वापरत होता.

उर्फीने गेल्या आठवड्यातच एफआयआर दाखल केली होती आणि त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंगही पोलिसांना दिले होते. अखेर पोलिसांनी आरोपीला पाटणा येथून अटक केली आहे. आरोपींविरुद्ध आयटी कायद्याच्या कलम 354, (ए), 354 (डी), 509, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तिला यापूर्वी जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या.

उर्फीने एका दिवसापूर्वी सोशल मीडियावर या धमकीबद्दल सांगितले होते. उर्फीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटद्वारे सांगितले होते की एक व्यक्ती तिला जीवे मारण्याची धमकी देत ​​आहे आणि तिने बलात्काराबद्दलही बोलले आहे. उर्फीने या संदर्भात एक व्हॉट्सअॅप स्क्रीनशॉट देखील शेअर केला होता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा