मनोरंजन

Urfi Javed: उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी; कारण काय?

अभिनेत्री उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला.

Published by : Team Lokshahi

Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. त्या व्हिडिओमध्ये तिने 'भूल भुलैया' सिनेमातील राजपाल यादवचा छोटा पंडिताचा गेटअप केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने उर्फी जावेदला ईमेलच्या माध्यमातून धमकी दिली. व्हिडीओ डिलीट करण्यास सांगितले आणि तसे न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती उर्फीने चाहत्यांना X (ट्वीट) करत दिली आहे.उर्फीला दोन वेगवेगळ्या ईमेल आयडीवरून मेल आले आहेत. उर्फीने ट्वीट करत लिहिलं आहे,"या देशात घडणाऱ्या घटनांमुळे मला धक्का बसला आहे. सिनेमातील एक पात्र पुन्हा साकारल्याने मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे".

पहिला मेल निखिल गोस्वामी नावाच्या ईमेल आयडीवरून आला आहे. यात लिहिलं आहे,"तुम्ही अपलोड केलेला व्हिडिओ डिलीट करा, अन्यथा तुम्हाला मारायला वेळ लागणार नाही". त्यानंतर रुपेश कुमारने दुसरा मेल केला आहे. त्यात लिहिलं आहे,"उर्फी जावेद आमच्या हिंदू धर्माची बदनामी करत आहे. तुझं आयुष्य चांगल्यापद्धतीने जग नाहीतर अवघड होईल. कोणीही तुला वाचवायला येणार नाही".

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा