मनोरंजन

Deepika Padukon: दीपिका पादुकोणचे प्रेग्नेंसीदरम्यान बोल्ड फोटोशूट, रणवीरसह केला बेबी बंप शेअर

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग लवकरच एका छोट्या पाहुण्याचं स्वागत करणार आहेत. नुकतेचं दीपिकाने देखील तिचं पहिले मॅटर्निटी फोटोशूट शेअर केले आहे. ज्यात एकूण 14 फोटो आहेत.

Published by : Team Lokshahi

बॉलिवूडची सर्वात टॉपला असणारी दीपिका पादुकोण ही सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आली आहे. सुरुवातीला तिची प्रेग्नेंसी ही खोटी असावी अशी अफवा अनेकांकडून पसरवली गेली परंतू अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंड यांच्या विवाह सोहळ्यादरम्यान ती ऑन कॅमेरा आली होती आणि त्यादरम्यान तिने तिचे काही फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले होते यावरुन दीपिका प्रेग्नेंट नाही या अफवांना आळा बसला. प्रेग्नेंसीदरम्यान तिने जवान आणि पठान या चित्रपटात काम देखील केलं आहे. याशिवाय ती नुकताच आलेला कल्की 2898 एडी या चित्रपटात देखील पाहायला मिळाली. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग लवकरच एका छोट्या पाहुण्याचं स्वागत करणार आहेत.

आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी आपले मॅटर्निटी फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि नुकतेचं दीपिकाने देखील तिचं पहिले मॅटर्निटी फोटोशूट शेअर केले आहे. ज्यात एकूण 14 फोटो आहेत. प्रत्येक फोटोत तिने किमान 2-3 वेगवेगळे पोशाख परिधान केले आहेत. तिच्या या फोटोशूटला रणवीरची देखील साथ पाहायला मिळत आहे. त्यांचे हे फोटो ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईटमध्ये पाहायला मिळत आहे. जे बोल्ड असले तरी त्यात दोघांच ही एकमेकांवर असलेलं प्रेम पाहायला मिळत आहे.

या फोटोंद्वारे हे दोघे ही बाळाची आतुरतेने वाट पाहत आहेत ते दिसून येते तसेच दीपिका तिच्या मातृत्वाचा पुरेपूर आनंद घेत असताना दिसत आहे. तसेच या दोघांच्या फोटोला अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी कमेंट केले आहेत. तसेच कमेंटद्वारे दोघांचे ही अभिनंदन केले आहे. दीपिकाच्या मॅटर्निटी फोटोशूटवर चाहत्यांकडून देखील कौतूकांचा वर्षाव होताना दिसत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा