DEEPIKA PADUKONE LAUNCHES THE ONSET PROGRAM TO EMPOWER NEXT-GEN CREATIVE TALENT 
मनोरंजन

Deepika Padukone: दीपिका पदुकोणने वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना दिली मोठी भेट, ‘द ऑनसेट प्रोग्राम’ लाँच

The Onset Program: दीपिका पदुकोणने वाढदिवसाच्या दिवशी ‘द ऑनसेट प्रोग्राम’ लाँच करून नव्या क्रिएटिव्ह टॅलेंटसाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.

Published by : Dhanshree Shintre

अभिनेत्री, दीपिका पदुकोण आपल्या अभिनयाबरोबर निर्माती आणि मानसिक आरोग्यासाठी देखील ओळखली जाते. दीपिका पदुकोण हिने आपल्या वाढदिवशी नवे आणि तरुण क्रिएटिव्ह टॅलेंट पुढे आणण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे.

खऱ्या कथांना आणि नव्या टॅलेंटला प्रोत्साहन देण्याच्या आपल्या विचारसरणीला पुढे नेत, दीपिकाने आज ‘द ऑनसेट प्रोग्राम’ची घोषणा केली. हा तिच्या ‘क्रिएट विथ मी’ प्लॅटफॉर्मचा पुढचा टप्पा आहे. याचा उद्देश भारतीय फिल्म, टीव्ही आणि जाहिरात क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या नव्या कलाकारांना संधी देणे आहे, ज्यामुळे त्यांची कला पाहिली जाईल, ऐकली जाईल आणि योग्य प्रकारे प्लॅटफॉर्म मिळेल.

हा प्रोग्राम केवळ गुणवत्तापूर्ण आणि हुशार लोकांना शिकण्याच्या संधी देणार नाही, तर ज्यांच्याकडे स्वतःचे प्रोजेक्ट हाताळण्याचा अनुभव आणि कौशल्य आहे, त्यांनाही पुढे जाण्याची संधी उपलब्ध करून देईल. पहिल्या टप्प्यात लेखन, दिग्दर्शन, कॅमेरा, लाईट, एडिटिंग, साउंड, आर्ट, कॉस्च्युम डिझाईन, हेअर स्टायलिंग, मेकअप आणि प्रोडक्शन अशा क्षेत्रांचा समावेश असेल. आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर करत दीपिका म्हणाली,

“गेल्या एका वर्षापासून देशात आणि देशाबाहेर असलेल्या उत्तम क्रिएटिव्ह टॅलेंटला ओळख देणे, त्यांना पाहण्यास-ऐकण्यास आणि अनुभव देण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देण्याबद्दल मी खूपच प्रामाणिकपणे विचार करत आहे. ‘द ऑनसेट प्रोग्राम’च्या लाँचची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे आणि पुढच्या पिढीच्या क्रिएटिव्ह टॅलेंटशी तुम्हा सर्वांना भेट करून देण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे.”

“गेल्या एका वर्षापासून देशात आणि देशाबाहेर असलेल्या उत्तम क्रिएटिव्ह टॅलेंटला ओळख देणे, त्यांना पाहण्यास-ऐकण्यास आणि अनुभव देण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देण्याबद्दल मी खूपच प्रामाणिकपणे विचार करत आहे. ‘द ऑनसेट प्रोग्राम’च्या लाँचची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे आणि पुढच्या पिढीच्या क्रिएटिव्ह टॅलेंटशी तुम्हा सर्वांना भेट करून देण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे.”

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा