मनोरंजन

Deepika Padukone, Ranveer Singh Reveals Baby Girl Name: लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहुर्तावर केले लेकीचे नाव जाहीर, दीपिका आणि रणवीरच्या "दुआ" ला मंजुरी

दीपिका आणि रणवीर यांना झालेल्या मुलीचं नाव त्यांनी लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहुर्तावर सोशल मीडियाद्वारे जाहीर केले आहे.

Published by : Team Lokshahi

बॉलिवूडचे लोकप्रिय कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी अखेर गोड बातमी दिली आहे. दीपिका पादुकोणनने एका मुलीला जन्म दिला. गेले कित्येक महिने चाहते त्यांच्या बाळाची वाट पाहत होते. आता दीपिका रणवीर आई- बाबा झाले आहेत. 8 सप्टेंबर 2024 रोजी दीपवीर आईवडील झाले. दीपिका आणि रणवीर यांना कन्यारत्न झालं आहे. चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर त्यांच्या बाळाचा जन्म झाल्याने चाहते प्रचंड खुश झाले.

दीपिका आणि रणवीर यांना झालेल्या मुलीचं नाव त्यांनी लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहुर्तावर सोशल मीडियाद्वारे जाहीर केले आहे. त्यांनी मुलीचे नाव दुआ असे ठेवले आहे तर मुलीला लाल रंगाचे छान कपडे परिधान केले असून दुआच्या पायांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तसेच कॅप्शनला तिने "दुआ पादुकोण सिंह" असे लिहले असून दुआचा अर्थ सांगितला आहे. "'दुआ' : म्हणजे प्रार्थना. कारण ती आमच्या प्रार्थनांचे उत्तर आहे. आमचे हृदय प्रेम आणि कृतज्ञतेने भरलेले आहे". असं कॅप्शन दिले आहे. तिच्या या पोस्टद्वारे दुआला अनेक चाहत्यांकडून आणि अभिनेत्यांकडून खुप खुप प्रेम आणि आशिर्वाद मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Video Viral : हिंदुस्तान जिंदाबाद... लंडनमध्ये मुस्लिम मुलींचं तिरंग्यासाठी भिडल्या; नेमकं प्रकरण काय?

AsiaCup 2025 : ...तरीही त्याला संघात संधी! कॅप्टन दादाकडून 'या' खेळाडूबद्दल महत्त्वाचं वक्तव्य; म्हणाला,

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द

Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनसुनावणी दरम्यान हल्ला; आरोपीबाबत महत्त्वाची बातमी समोर