मनोरंजन

Deepika Padukone And Ranveer Singh : दीपवीरच्या विवाहसोहळ्याचा व्हिडीओ व्हायरल, पहा त्यांच्या लग्नातील धमाल

Deepika Padukone And Ranveer Singh: करण जोहरच्या कॉफी विथ करण 8 या चॅट शोचा पहिला एपिसोड रिलीज झाला आहे. या सीझनची सुरुवात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी केली.

Published by : Team Lokshahi

Deepika Padukone And Ranveer Singh: करण जोहरच्या कॉफी विथ करण 8 या चॅट शोचा पहिला एपिसोड रिलीज झाला आहे. या सीझनची सुरुवात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी केली.

रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाला पाच वर्षे झाली आहेत. या जोडप्याने इटलीमध्ये लग्न केले होते. त्यानंतर त्यांनी बंगळुरू आणि मुंबईत लग्नाचे रिसेप्शन केले होते. जिथे मोठमोठ्या स्टार्सनी देखील हजेरी लावली होती. त्यांनी त्यांच्या लग्नसोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. पण आता त्यांच्या लग्नातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांच्या विवाहसोहळ्याचा व्हिडीओ कॉफी विथ करण या कार्यक्रमामध्ये देखील दाखवण्यात आला. व्हिडीओमध्ये या स्टार जोडप्याच्या लग्नासोहळ्याची झलक दाखविली आहे.

दीपिका आणि रणवीरच्या लग्नासोहळ्याच्या व्हिडीओची सुरुवात त्यांच्या एंगेजमेंट पार्टीपासून होते. ज्यामध्ये रणवीर हा दीपिकाला प्रपोज करतो. दीपिका आणि रणवीर यांच्या लग्नसोहळ्यातील सर्व फंक्शन्स व्हिडीओमध्ये दाखवण्यात आली आहेत. मेहेंदी सोहळ्यात रणवीर आणि दीपिकाचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये रणवीर डान्स देखील करताना दिसत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : काल एक गद्दार काल बोलला 'जय गुजरात' - उद्धव ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "मराठी शिकणारे शिक्षणमंत्री इंग्रजीमध्ये शिकणारा..." राज ठाकरेंचा नाव न घेता टोला

Raj Thackeray Live : 'जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलंय'; राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Raj-Uddhav Thackeray Family Member Vijayi Melava : सहकुटुंब सहपरिवार..; ठाकरे बंधूंचे कुटुंब एकाच व्यासपीठावर