मनोरंजन

'छावा' चित्रपटादरम्याने स्क्रीननेच घेतला पेट, प्रेक्षकांचा उडाला गोंधळ

मात्र या चित्रपटाच्या दरम्यानचे अनेक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

Published by : Team Lokshahi

सध्या विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट खूप चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये विकी कौशल आणि रश्मिका मंदना यांच्यादेखील मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाने 12 दिवसांतच 350 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाला भारतातच नाही तर जगभरातून अधिक पसंती मिळत आहे. मात्र या चित्रपटाच्या दरम्यानचे अनेक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. आशातच आता एक नवीन माहिती समोर आली आहे.

दिल्ली येथील एका सिलेक्ट सिटी मॉलमध्ये एका सिनेमा हॉलमध्ये 'छावा' चित्रपट सुरु असताना पडद्याला यंग लागण्याची घटना समोर आली आहे. यामुळे सर्वत्र एकच गोंधळ उडाली आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचे समोर आले आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

याबद्दल तिथे असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी घडलेल्या प्रसंगाबद्दल सांगितले आहे. एक व्यक्तीने माहिती दिली की, मॉलमधील पीव्हीआर सिनेमाच्या चित्रपटगृहाच्या एका कोपऱ्यात संध्याकाळी 4.15 वाजता 'छावा' चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यान आग लागली. ज्यामुळे चित्रपट पाहणाऱ्यांमध्ये भितीचं वातावरण पसरलं.

दरम्यान आग लागल्याची माहिती कळताच पोलिस लगेचच घटनास्थळी दाखल झाले. नंतर अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग विझवण्याचा प्रयत्न केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा