मनोरंजन

‘टाइमपास ३’ चित्रपटातील धमाल गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्सची निर्मिती, रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास ३' (Timepass 3 ) येत्या २९ जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील एक धमाल गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्सची निर्मिती, रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास ३' (Timepass 3 ) येत्या २९ जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील एक धमाल गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

टाइमपास ३ च्या टिझर आणि ट्रेलरमधून एका गाण्याच्या केवळ एकाच ओळीने प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली होती. ‘याच्या रिक्षाच्या हॉर्नमधनं आली वाघाची डरकाळी’ ! अशी या गाण्याची ओळ होती. ही एवढी एकच ओळ ऐकून हे गाणं धमाल असणार आहे, हे आधीच प्रेक्षकांनी ओळखलं होतं. त्यामुळे सर्व प्रेक्षक फार उत्सुकतेने या गाण्याची वाट बघत होते. अखेर त्यांची ही प्रतिक्षा संपली असून नुकतंच हे गाणं प्रदर्शित झालं आहे.

क्षितीज पटवर्धनचे शब्द असलेल्या या गाण्याला अमित राज यांनी संगीतबद्ध केलं आहे तर वैशाली सामंत यांनी या गाण्याला आवाज दिला आहे.वैशाली सामंतने हे गाणं तिच्या जबरदस्त आवाजात गायले आहे. कृतिका गायकवाडने या गाण्यावर ठेका धरला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा