मनोरंजन

Dia mirza | दोन महिन्यांपूर्वीच दिया मिर्झा झालीय आई

Published by : Lokshahi News

अभिनेत्री दिया मिर्झाने एका मुलाल जन्म दिला आहे. दियाने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर करत मुलाच्या जन्माची बातमी चाहत्यांसोबत शेअर केलीय. खरं तर दियाने १४ मेला म्हणजेच दोन महिन्यापूर्वाच मुलाला जन्म दिला आहे. दियाचं बाळ प्रीमॅच्युर म्हणजे वेळे आधीच जन्माला आलं होतं. त्यानंतर दोन महिन्यांपासून ते आयसीयूमध्ये आहे.

मुलाच्या जन्मानंतर दोन महिन्यांनी दियाने इन्स्टाग्रामवरून ती आई झाल्याची गोड बातमी शेअर केलीय. आमचं काळीज असेल्या आमच्या मुलाचा अव्यान आझादचा जन्म १४ मेला झालाय. तो लवकर आला. त्यानंतर आमचा हा चिमुकला नवजात मुलगा आयसीयूमध्ये नर्स आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे." असं दियाने तिच्या पोस्टमध्ये सांगितलं आहे.

दियाने तिच्या लवकर झालेल्या प्रसूतीबद्दलही पोस्टमध्ये लिहिलं आहे. "मला गरोदरपणात अचानक अ‍ॅपेंडेक्टॉमी आणि गंभीररित्या बॅक्टेरियल इंफेक्शन झालं. हे जीवघेण ठरू शकलं असतं. नशीबाने आमच्या डॉक्टरांनी वेळेत काळजी घेत सी-सेक्शन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बाळाचा सुरक्षितरित्या जन्म होवू शकला." असं दियाने सांगितलं.

बेबी बंप सोबत फोटो शेअर करत दिया मिर्झाने ती गरोदर असल्याची माहिती सोशल मीडिया वरून दिली होती. पती वैभव रेखीसोबत लग्न गाठ बांधण्याआधीच दिया गरोदर असल्यामुळे सोशल मीडिया वरून तिच्यावर टीका करण्यात आली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Thackeray Vijayi Melava : शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या युतीवर प्रश्नचिन्ह? म्हणाले "राज ठाकरे कुठेही असं म्हणाले नाही..."

Thakare Bandhu Special Report : राज-उद्धव यांच्या दुश्मनीचा इतिहास काय?, नेमकं कुठं बिनसलं होतं? जाणून घ्या...

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ पुन्हा जोमात, 52 चेंडूत 10 चौकार अन् 7 षटकारांसह इंग्लंडला चोपल

Eknath shinde On Thackeray vijayi melava : "...त्यासाठी मनगटात जोर लागतो", ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया