बिग बॉसच्या सातव्या सीझनची विजेती गौहर खानने काही दिवसांपूर्वी ती आई होणार असल्याचे सांगितले होते. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती.
गौरह खान आता वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने प्रेग्नन्सीमध्ये भन्नाट रॅम्प वॉक केला आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रॅम्प वॉकसाठी गौहर हीने इंडोवेस्टर्न लूक केला आहे. त्यासाठी तिने साडी परिधान केली आहे. ती रॅम्प वॉक करत बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
गौहरच्या या लूकचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यासोबतच तिला एका बाजूने ट्रोल देखील करण्यात आले आहे. गौहर खानने प्रेग्नन्सीमध्ये उंच टाचांच्या हील्स घालून रॅम्प वॉक करत आहे. तिचा आत्मविश्वास तिच्या डोळ्यात पाहायला मिळत आहे. गौहरच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. काही नेटकरी तिच्या रॅम्प वॉकचे कौतुक करत आहेत. तर काही नेटकरी तिने घातलेल्या हीलमुळे ट्रोल करत आहे.