मनोरंजन

साराचा बोल्ड लूक पाहिलात का?

Published by : Lokshahi News

अभिनेत्री सारा अली खानने आपल्या अभिनयाने आणि सौदर्याने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच जागा निर्माण केली आहे. सोशल मीडियावर सारा अली खान जास्त सक्रिय असते. सारा सोशल मीडियावर चाहत्यांसाठी फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.

नुकताच साराने तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले असून तिच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. या फोटोमध्ये साराने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून हे फोटो शेअर करत 'काश कभी यूं हो न हसरतें न जुनून हो, तेरा खयाल हो और तु हो दिल में बस सुकून हो।', असे कॅप्शन दिले आहे.

साराचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. साराच्या या फोटोला १५ लाख पेक्षा जास्त लोकांनी लाइक केले आहे.

सारा आता लवकरच 'द इम्मोर्टल अश्वत्थामा' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सारासोबत विकी कौशलसुद्धा दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे आदित्य धर करणार आहे. यासोबतच सारा सारा दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या 'अतरंगी रे' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि धनुषही आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद