मनोरंजन

विनोदवीर कुशल बद्रिकेच्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो पाहिलंत का?, जाणून घ्या कोणकोण आहे त्याच्या कुटुंबात

Published by : Team Lokshahi

सेलिब्रेटींच्या (celebrities) खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीत उत्सुक असतात. ते कुठे रहातात, त्यांच्याकडे कोणती गाडी आहे, कुटुंबात कोणकोण लोक आहेत. आज आम्ही तुम्हाला मराठी सिनेइंडस्ट्रीतील (Marathi Cineindustry) विनोदवीर कुशल बद्रिकेच्या (kushal Badrike) कुटुंबाविषयी सांगणार आहोत.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी शो चला हवा येऊ द्या (chala hawa yeu dya) महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला आहे. कुशल बद्रिकेने (Kushal Badrike) आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. कोणतंही स्कीट सादर करताना स्टेजवरील एनर्जी (Energy), आपल्या सहकलाकारासह असलेलं त्याचं ट्युनिंग (Tuning) यामुळे कुशल रसिकांना खळखळून हसवतो. कुशल सोशल मीडियावरही (social media) तितकाच अ‍ॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या रसिकांशी कनेक्ट होत संवाद साधतो. सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्यातील क्षण तो रसिकांसह शेअर करतो. आपले फोटो आणि व्हिडीओ तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. अनेकवेळा कुशल आपल्या कुटुंबासोबतचे फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर करत असतो.

कुशल, सुनैना (Sunaina) आणि त्यांचा मुलगा असं त्यांचं छोटं कुटुंब आहे. कुशलसाठी त्याचं कुटुंब (Family) हेच जग असून त्यांच्यातच तो सुख शोधतो. अनेकवेळाला कुशल मुलासोबत स्वत अभ्यास करताना, तर कधी फॅमिली पिकनीकला जातानाचे फोटो शेअर करत असतो.  कुशलची पत्नी सुनैना कथ्थक नृत्यांगणा (Kathak dancer) आहे. त्याची पत्नी ही दिसायला अतिशय सुंदर असून मुलगा देखील खूपच गोड आहे.

Daily Horoscope 29 April 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 29 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

फडणवीसांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना धाराशिवमध्ये धरलं धारेवर; म्हणाले, "मोदींच्या ट्रेनमध्येच..."

T20 World Cup Selection : धावांचा पाऊस पाडणाऱ्या के एल राहुलचा पत्ता कट? भारतीय संघात 'या' दिग्गज खेळाडूंची केली निवड

"...म्हणून नरेंद्र मोदींच्या अंगात औरंगजेब संचारलाय"; संजय राऊतांनी सासवडमध्ये महायुतीवर डागली तोफ