Shahrukh Khan Team Lokshahi
मनोरंजन

किंग खान अजून संपलेला नाही; 'पठाण'चे डीजीटल राईट्स तब्बल...

शाहरूख करतोय 3 वर्षांनंतर पुनरागमन

Published by : Vikrant Shinde

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान (Shahrukh Khan) उर्फ किंग खान हा मागील काही काळात मोठ्या पडद्यापासून दुर असल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र आता जवळपास 3 वर्षांनी शाहरूख नव्या सिनेमासह प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शाहरूखच्या आगामी चित्रपटाचं शीर्षक हे 'पठाण' (Pathan) असं असणार आहे.

चित्रपट केव्हा व कोणत्या OTT वर रीलीज होणार?

पठाण हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना निदान वर्षभर तरी वाट पाहावी लागणार आहे. हा चित्रपट 2023 साली रीलीज होणार असल्याचं समजतं आहे. असं असलं तरीही शाहरूखने ह्या सिनेमाचे प्रमोशन करण्यास आतापासूनच सुरूवात केली आहे. तर, हा सिमेमा 'अॅमेझॉन प्राइम' (Amazon Prime) ह्या OTT प्लॅटफॉर्मवर रीलीज होणार आहे. ह्या सिनेमाचे डीजीटल राईट्स विकत घेण्यासाठी अॅमेझॉन प्राइमने तब्बल 200 कोटींची किंमत मोजल्याची माहिती मिळते आहे.

सिनेमामधअये आणखी कोणते चेहरे दिसणार?

'पठाण' सिनेमात शाहरुख अॅक्शनमोडमध्ये दिसणार आहे. दीपिका पदुकोनशिवाय या सिनेमात ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया, आशुतोष राणा, जॉन अब्राहम आणि सलमान खान मुख्य भूमिकेत आहेत. शाहरुख जवळपास तीन वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा