छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही गेली अनेक वर्ष लोकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. तारक मेहता मालिकेमधील दया आणि जेठालाल या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. जेठालाल ही भूमिका अभिनेता दिलीप जोशी हे साकारतात. दिलीप यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांच्या सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळाली.
जाणून घेऊयात दिलीप जोशी यांच्या संपत्तीबाबत…
मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप जोशी यांच्याकडे लग्झरी गाडी आहे. तसेच त्यांचे मुंबईमध्ये आलिशन घर देखील आहे. रिपोर्टनुसार, दिलीप जोशी यांची एकूण संपत्ती 43 कोटी रूपये आहे. दिलीप हे तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या एका एपिसोडचे 1.5 लाख रुपये मानधन घेतात.
दिलीप जोशी यांनी 'मैने प्यार किया', 'वन 2 का 4', 'ढूंढते रह जाओगे', 'वॉट्स योर राशि', 'खिलाड़ी 420', 'हमराज' आणि 'फिराक' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. कोरा कागज' आणि 'दाल में काला' या टिव्ही शोमध्ये देखील काम केले आहे.