अभिनेत्री राखी सावंत आणि पती आदिल दुर्राणी यांच्यातील वाद अखेर मिटला आहे. दोघांनी एकमेकांविरोधात केलेले गुन्हे मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आले आहेत. परस्परांविरोधातील गुन्हे रद्द करण्यास दोघांनी अनुमती दर्शविल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने गुन्हे रद्द केले. मंगळवारी दोघांनी उच्च न्यायालयात हजर राहत परस्परांविरोधातील गुन्हे रद्द करण्यास अनुमती दर्शवली होती. दुर्रानी विरोधात राखी सावंतने ओशिवरा पोलीस ठाण्यात तर दुर्रानीने राखी विरोधात आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.