मनोरंजन

"सिनेमाची स्वतःचं तिकीट खरेदी करून खोटं कलेक्शन...", दिव्या खोसलाचा आलिया भट्टवर मोठा आरोप! थेट फोटो शेअर करत म्हणाली…

आलिया भट्ट सध्या तिच्या ‘जिगरा’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. ११ ऑक्टोबरला हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाची निर्मिती देखील आलियाने स्वत: केली आहे.

Published by : shweta walge

आलिया भट्ट सध्या तिच्या ‘जिगरा’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. ११ ऑक्टोबरला हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाची निर्मिती देखील आलियाने स्वत: केली आहे. नुकतेच या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शनही समोर आलं. या सिनेमाने पहिल्या दिवशी 4.5 करोड रुपयांची कमाई केल्याचं जाहीर करण्यात आलं. यावरुनच अभिनेत्री दिव्या खोसलाने खोटे बॉक्स ऑफिस कलेक्शन शेअर केल्याचा दावा केला आहे. दिव्याने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. त्यात तिने रिकाम्या थिएटरचा फोटो पोस्ट केला असून आलियाच्या जिगरा सिनेमाचा शो सुरु असल्याचं दिसत आहे.

या पोस्टमध्ये तिने म्हटलं आहे कि,"मी सिटी मॉलमधील पीव्हीआर सिनेमागृहामध्ये जिगरा सिनेमाची तिकीट बुक केली. थिएटर पूर्ण रिकामं होतं आणि याचप्रमाणे सगळे थिएटर्स रिकामे आहेत. आलिया भट्टमध्ये खरंच जिगरा आहे जिने स्वतःचं तिकीट खरेदी करून खोटे कलेक्शन जाहीर केले आहेत. मला प्रश्न पडला आहे ही पैसे घेऊन काम करणारी मीडिया शांत का आहे ? "

आलिया भट्टचा जिगरा हा चित्रपट रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे. नुकतेच कंगना रणौतने आलिया भट्टला चित्रपटाच्या थंड ओपनिंगबद्दल अप्रत्यक्ष टोला लगावलाआणि आता दिव्या खोसलाने एका पोस्टद्वारे थेट आलिया भटवर निशाणा साधला आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अद्याप काही खास कमाई करता आलेली नाही. प्रेक्षकांनी आलिया भट आणि वेदांग रैना स्टारर या चित्रपटाकडे पाठ फिरवल्याचं दिसत आहे. अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शो रद्द करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा