मनोरंजन

Dr.Amol Kolhe: डॉ. अमोल कोल्हे ‘आला बैलगाडा’ गाणं पाहून झाले भावूक

अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बीग हिट मीडिया प्रस्तुत ‘आला बैलगाडा' गाण्याच्या संगीत अनावरण सोहळ्याला विशेष हजेरी लावली.

Published by : Team Lokshahi

अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बीग हिट मीडिया प्रस्तुत ‘आला बैलगाडा' गाण्याच्या संगीत अनावरण सोहळ्याला विशेष हजेरी लावली. आला बैलगाडा हे गाण सुप्रसिद्ध गायक ‘आदर्श शिंदे’ आणि सुमधूर गळ्याची गायिका ‘सोनाली सोनावणे’ यांनी गायले आहे. तर मिलिनिअर संगीतकार ‘प्रशांत नाकती’ याने या गाण्याचे संगीत केले आहे. ‘हृतिक अनिल मनी’ आणि ‘अनुष्का अविनाश सोलवट’ यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे. श्री. राजा माने (संस्थापक अध्यक्ष, डिजीटल मीडिया जर्निलिस्ट असोसिएशन, महाराष्ट्र राज्य), श्री. संतोष ठोंबरे (उद्योजक), श्री. कृष्णा पंड्या (संस्थापक आणि सी.ई.ओ, V21 ग्रुप) हे प्रमुख पाहुणे देखिल उपस्थित होते. याशिवाय हिंदी, मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर तसेच चित्रपट सृष्टी मध्ये गेल्या अनेक दशकापासून कार्यरत असलेले अनिल मनी आणि माननीय मुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे खाजगी सचिव अविनाश सोलवट यांची देखील विशेष उपस्थिती होती.

डॉ. अमोल कोल्हे आला बैलगाडा गाण्याविषयी सांगतात, “गाणं पाहून डोळ्यात पाणी आलं. कारण, 2019 ला जेव्हा लोकसभेची निवडणूक लढवत होतो. त्यानंतर जेव्हा जेव्हा संसदेत बोलायला उभं राहिलो. तेव्हा थट्टेनं बाकीचे खासदार उभं राहिलो की बोलायचे बैलगाडा की शिवाजी महाराज!! हे केवळ मनोरंजन नाही, ही 400 वर्षांची परंपरा आहे. हे सर्व सामान्य शेतक-यांचं मनोरंजन आहे. यामुळे ग्रामीण रोजगाराला चालना मिळते. कारण 2 हजार उंब-याच्या गावात जेव्हा 4 ते 5 हजार लोक येतात. तेव्हा त्या इकॉनोमीला एक चालना मिळते. गोडी शेव, भेल या सर्वांना एक रोजगार उपलब्ध होतो. त्याचबरोबर पर्यटनाला देखील चालना मिळते.”

पुढे ते पंड्या सरांना उद्देशून सांगतात, “आमचं मोठं स्वप्न आहे की जर स्पेनची इकॉनोमी बुलरन आणि स्पॅनिश बुल फाइट वर चालू शकते. तर आपण पण आंतरराष्ट्रीय टुरीझम आपल्या ‘बौलगाडा’साठी करू शकतो. बीग हिट मीडियाचे निर्माते हृतिक अनिल मनी आणि अनुष्का अविनाश सोलवट आणि संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानतो. कारण मुलं एखादं स्वप्न पाहतात आणि पालक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहतात. ते अस्तित्वात येतं. तुम्ही अश्या विषयाला निवडलं आहे जो विषय फार महत्वाचा आहे. आपल्या भारतामध्ये अनेक परंपरा आहेत, वेगवेगळ्या संस्कृती आहेत. पण त्याचं कल्चरल नरेटीव्ह करायला आपण कुठे तरी कमी पडंत असतो. पण तुम्ही या गाण्यातून ते योग्यपणे मांडल.”

पुढे ते संगीतकार प्रशांत नाकतीला म्हणाले “गाण एकदम नादखुळा झाल आहे. बीग हिट मीडियाने हा विषय निवडला त्यासाठी तुमचे कौतुक. तुमच्या गाण्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळो यासाठी शुभेच्छा”

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ashadhi Wari 2025 : आषाढीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी वारीसाठी एसटी महामंडळाकडून विशेष गाड्यांची सुविधा; जाणून घ्या

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात पावसाचा तांडव ; ढगफुटीमुळे 69 मृत्यू, 400 कोटींचं नुकसान

Amit Shah Pune : "बाजीराव पेशवेंनी 40 वर्षाच्या आयुष्यात..." पुण्यात शाहांकडून पेशवांच्या शौर्यावर भाष्य