मनोरंजन

Dream Girl 2: आयुष्मानच्या ड्रीम गर्लला पाहिलं का?

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना हा त्याच्या 'ड्रीम गर्ल 2' चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे.

Published by : Team Lokshahi

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना हा त्याच्या 'ड्रीम गर्ल 2' चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याचा २०१९ मध्ये ड्रीम गर्ल हा चित्रपट रिलीज झाला होता. विशेष म्हणजे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरला. या चित्रपटामध्ये आयुष्मानने धडाकेबाज अभिनय केला. आता लवकरच चाहत्यांच्या भेटीला ड्रीम गर्ल २ येणार आहे.

या चित्रपटात ड्रीम गर्लच्या पहिल्या भागाप्रमाणेच अभिनेता आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत आहे. त्याचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता ड्रीम गर्ल २ हा चित्रपट २५ ऑगस्ट 2023 ला प्रेक्षकांच्या भेटाला येणार आहे. आता आयुष्मान खुरानाने 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटातील त्याचा म्हणजेच पूजाचा फर्स्ट लूक सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. पूजाची झलक शेयर करत आयुष्मानने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'ही फक्त पहिली झलक आहे. आरशात दिसणाऱ्या वस्तू या खऱ्या दिसण्यापेक्षा सुंदर असतात.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा