मनोरंजन

‘या’ करणामुळे आलिया भट्ट पुन्हा झाली ट्रोल

Published by : Lokshahi News

बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या कॅप्शनमुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी ही आलीय भट्टने असचं काहीसं कॅप्शन दिल आहे. तिने या शुभेच्या तिच्या इस्टाग्राम अकाऊटवरून स्टोरीवर टोकियो ऑलिम्पिक २०२० संबधित एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो २०२० टोक्यो ऑलिम्पिकचा नसल्यामुळे आलिया प्रचंड ट्रोल झाली. यावर नेटीझन्सने भन्नाट प्रतिकिया नोंदवल्या आहेत. तिच्या त्या स्टोरीचा स्क्रीन शॉट सगळीकडे व्हायरल झाला आहे.कोविड-१९ मुळे पाठच्या वर्षीचे ऑलिम्पिक पुढे ढकलेले गेले होते.

काय होती पोस्ट?
अभिनेत्री आलिया भट्ट हिने शनिवारी इस्टाग्रामवर टोक्यो ऑलिम्पिक गेम्स २०२० च्या ऐवजी २०१२ लंडन समर ऑलिम्पिकचा फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करतांना तिने टोक्यो २०२१ हा हॅशटॅग वापरला. नेटिझन्सने त्या फोटोमधील ग्रुपमध्ये उपस्थित असलेल्या अॅथलीट्सपैकी एक पैलवान सुशील कुमार आहे हे बरोबर नोटीस केलं. सुशील कुमार सध्या खुनाच्या आरोपाखाली तुरूंगात आहे. हा फोटो बघून नेटीझन्स म्हणाले की "सुशील कुमारचा फोटो टाकला आहे?", "हा माणूस सुशील कुमार सध्या खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये आहे" "आलियाने टोक्यो ऑलिम्पिक २०२० मध्ये सुशील कुमारलाही पोहचवलं" अशा प्रतिक्रिया दिल्या.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा