मनोरंजन

“पांडुरंगाचा टिळा आणि गुगल मॅप्सचे अनोखे कनेक्शन”, अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

कोरोनाच्या 2 वर्षानंतर यंदा आषाढी वारीचा उत्साह जोरदार होता. मोठ्या उत्साहात आणि दिमाखात आषाढी वारी साजरी करण्यात आली. पंढरपूरात मोठ्या भक्तीभावानं सर्व वारकरी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते.

Published by : Siddhi Naringrekar

कोरोनाच्या 2 वर्षानंतर यंदा आषाढी वारीचा उत्साह जोरदार होता. मोठ्या उत्साहात आणि दिमाखात आषाढी वारी साजरी करण्यात आली. पंढरपूरात मोठ्या भक्तीभावानं सर्व वारकरी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते. याच पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीच्या निमित्ताने अभिनेता वरुण भागवत याने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने पांडुरंगाचे आणि गुगल मॅपचे अनोखे कनेक्शन दाखवले केले आहे. ज्यात यात त्याने विठ्ठलाच्या कपाळी असणाऱ्या टिळ्याचे आणि रस्ता दाखवणऱ्या गुगल मॅप्सचं आगळंवेगळं नातं सांगितलं आहे.

वरुण भागवत हा इन्स्टाग्रामवर चांगलाच अॅक्टिव्ह असतो. वरुण हा सोनी मराठी वाहिनीवरील ‘ज्ञानेश्वर माउली’ या मालिकेत संत ज्ञानेश्वरांची भूमिका साकारत आहे.

त्याने लिहिले की, पांडुरंग आणि Google maps.

कधी पाहिलंय का की पांडुरंगाचा टिळा आणि Google maps च्या app चा symbol हा जवळजवळ सारखा आहे. मी निरीक्षण करत बसलो आणि लक्षात आलं की बरोबर. दोघेही final destination सांगतात. Google map आपल्याला इप्सित स्थळी पोहोचवतो आणि पांडुरंगाचा तो टिळा (नाम) हे दर्शवतो की इथे पोहोचायचय.

Google map रस्ता दाखवतो. पांडुरंग मात्र म्हणतो की रस्ता तुम्ही शोधा. तिथपर्यंत पोहोचण्याचं गमक तो सांगतो. प्रत्येकाचे रस्ते भिन्न असतील. प्रत्येकाच्या रस्त्यात मधे मधे सतत stops लागतील. त्या stops चं नाव असेल कर्म. एका कर्माची रेषा हिरवी तर दुसऱ्याची लाल असेल. हिरवा रंग म्हणजे चांगलं कर्म. लाल म्हणजे कुकर्म. हिरवं कर्म निवडायचं यासाठीची बुध्दी पांडुरंग आपल्याला देतो, ती वापरायचं काम आपलं. नाहीतर लाल रंगाच्या कर्माच्या traffic jam मधे आपण फसतो आणि काही केल्या त्यातून बाहेर पडता येत नाही. Choice आपल्या हातात दिलाय. योग्य निवड करत जात राहायचं.

रस्ता कधी कच्चा असतो, कधी पक्का.

कधी चढ तर कधी उतार.

कधी खड्डे तर कधी एकदम सुबक रस्ता.

कधी सरळ तर कधी वळणावळणाचा रस्ता.

कधी first gear तर कधी मस्त fifth gear वर जाता येईल.

कधी आपण रस्त्याचा हात पकडू, कधी तो आपला हात पकडेल, अर्थात कधी आयुष्य आपल्याला नेत राहील, कधी आपण आयुष्याला सांगू, चल आज या दिशेने जाऊ.

ज्याप्रमाणे रस्त्यात कधी गाडी बदलावी लागते त्याप्रमाणे आयुष्यात वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात.

कधी पायी चालावं लागतं त्याप्रमाणे जीवनात खडतर मार्ग अवलंबावा लागतो.

या जगात आपण सारेच मुसाफिर. भटकत असतो. रस्ता असतो. चालत राहतो. हवेसंग डोलत असतो. प्रवास आहे. आनंद घेत असतो. आनंद घेत नाही आहोत असं जाणवत असेल तर क्षणभर थांबून एकदा विचार करायचा आणि स्वतःला विचारायचं की प्रवासात मजा येते आहे ना?

कारण नीट विचार केला की कळतं की इथे destination महत्त्वाचं आहे पण प्रवास जास्त महत्त्वाचा आहे. प्रवास उत्तम करायचा आहे. ऊन, सावली, पाऊस, वारा सगळं लागणार आहेच. पण आयुष्याची वारी अथक पूर्ण करायची. तिही शक्य तिथे, शक्य तेव्हा, शक्य तेवढा, शक्य तेवढ्या साऱ्यांना आनंद देत.

कारण माउलींनी म्हटलंच आहे,

अवघाचि संसार सुखाचा करीन |

आनंदें भरीन तिन्ही लोक ||

जाईन गे माये तया पंढरपुरा |

भेटेन माहेरा आपुलिया ||

Destination तर set आहे. प्रवास उत्तम आणि आनंदी करणं आपल्याच हाती.ो

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live :19 वर्षानंतर राज-उद्धव ठाकरे एकत्र

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक

Chandu Mama on Raj- Uddhav Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र! चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना यश