मनोरंजन

फॅमिली कॉमेडी सिरीज 'हॅप्पी फॅमिली: कंडीशंस अप्लाय'चा ट्रेलर प्रदर्शित

अमेझॉन प्राइम व्हिडिओने आज फॅमिली कॉमेडी सिरीज 'हॅप्पी फॅमिली: कंडीशंस अप्लाय'चा ट्रेलर रिलीज करून जागतिक प्रीमियरची घोषणा केली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अमेझॉन प्राइम व्हिडिओने आज फॅमिली कॉमेडी सिरीज 'हॅप्पी फॅमिली: कंडीशंस अप्लाय'चा ट्रेलर रिलीज करून जागतिक प्रीमियरची घोषणा केली आहे. या सिरीजमध्ये राज बब्बर, रत्ना पाठक शाह, अतुल कुलकर्णी, आयेशा जुल्कासह रौनक कामदार, मीनल साहू, सनाह कपूर आणि अहान साबू या कलाकारांना पाहायला मिळेल.

आतिश कपाडिया आणि जेडी मजेठियाद्वारा निर्मित आणि दिग्दर्शित तसेच हॅट्स ऑफ प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मित असलेली, 'हॅप्पी फॅमिली: कंडीशंस अप्लाय' ही एक एपिसोडिक रिलीज असेल. पहिले चार भाग 10 मार्च रोजी प्राइम व्हिडिओवर 240 पेक्षा अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्रीमियर होणार असून, 31 मार्चपर्यंत दर शुक्रवारी 2 एपिसोड रिलीज होतील.

सिरीजचा हा ट्रेलर ढोलकियांच्या दुनियेत घेऊन जातो, जिथे एकाच घरात रहात असलेल्या ढोलकिया कुटुंबाच्या चार पिढ्यांना जीवनातील चढ-उतारांना एकत्र सामोरे जाताना पाहायला मिळेल. तसेच, जगासाठी भलेही ढोलकिया एक पिक्चर-परफेक्ट परिवार आहे. परंतु, इतर कोणत्याही कुटुंबाप्रमाणेच अकार्यक्षम असून, प्रत्येकाची स्वत:ची खास शैली, सूर आणि बोली आहे.

आतिष कपाडियाद्वारा लिखित 'हॅप्पी फॅमिली: कंडीशंस अप्लाय' या सिरीजमध्ये स्वाती दास, अतुल कुमार, करियुकी मार्गरेट वांजीकू, परेश गनात्रा, प्रणोती प्रधान, समर वर्मन्नी आणि नेहा जुल्का यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Aajcha Suvichar : आजचा सुविचार

Mumbai Water Supply : मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली, विंधन विहीर खोदकामाला परवानगी

OBC : ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात भरत कराड यांचा प्राणत्याग; कुटुंबाला आर्थिक मदतीची मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Weather News : गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका; राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट