मनोरंजन

Salman Khan New Look: सलमान खानच्या नव्या लूकवर चाहत्यांची चिंता

सलमान खानच्या नव्या लूकवर चाहत्यांची चिंता, 'सिंकदर' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे फोटो व्हायरल

Published by : Team Lokshahi

बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या 'सिंकदर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिगदर्शक एआर मुरुगादॉस यांनी केले आहे.या चित्रपटामध्ये सलमान खानसोबत रश्मिका मंदाना ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. याशिवाय या चित्रपटाची दोन गाणी प्रदर्शित झाली असून ती प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. सलामानाने नुकतेच 'सिंकदर'चे चित्रीकरण पुर्ण केले आहे. या चित्रपटाचा शेवटचा सीन मुंबईमध्ये चित्रित करण्यात आला होता. या दरम्यान सलमान खानचे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहे. या फोटोमध्ये सलमान खानचा नवा लूक समोर आला आहे. हा लूक पाहून चाहते काळजीत पडले आहेत.

सलमान खानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्या फोटोंमध्ये सलमान खान वय झालेलं दिसून येत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. समोर आलेल्या फोटोमध्ये सलमान खान पांढरा- निळा शर्ट, काळ्या लेदर जॅकेट आणि काळी टोपी घातलेला दिसून येत आहे. हे फोटो समोर येताच नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने कमेंट् करत लिहिले आहे की, "आमचा वाघ म्हातारा झाला आहे." त्यावर दुसरा नेटकरी असे लिहिले आहे की, "अचानक इतका म्हातारा झाला?" तसाच तिसरा नेटकरी लिहितो की, "आपला सुपरहिरो म्हातारा होतोय." अजून एक नेटकरी लिहितो की, "टेंशन घेऊन हा म्हातारा झाला" अशा अनेक कमेंट्स नेटकरी सलमान खानच्या फोटोवर करत आहे.

सलमान खानचा 'सिंकदर' कधी प्रेक्षकांच्या भेटीस येणार?

सलमान खानचा 'सिंकदर' या चित्रपटाचा टीझर आधीच प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये सलमान खान अॅक्शन करताना दिसला. या चित्रपटामध्ये सलमान खान, रश्मिका मंदानासोबत 'बाहूबली' फेम कटप्पाची भूमिका साकरणारा सत्यराज दिसत आहे. या चित्रपटामध्ये सत्यराज मुख्य खलनायकाची भूमिका साकारत दिसणार आहे. हा चित्रपट रमाजन ईदच्या मुहूर्तावर 28 मार्चला प्रदर्शित होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर! आत्तापर्यंत 276 नागरिकांचा मृत्यू