मनोरंजन

चला हवा येऊ द्या च्या मंचावर फराह खान

Published by : Lokshahi News

झी मराठीवर चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमावर तमाम प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील लोकं हा कार्यक्रम तितक्याच आवडीने पाहतात. कोरोनाच्या संकट काळात प्रत्येकजण ताणतणाव आहेत . पण काही क्षणासाठी चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवतो. मराठी कलाकारच नाही तर हिंदी कलाकारांना देखील या मंचाची ओढ आहे.

झी टीव्हीवर सुरु होणाऱ्या 'झी कॉमेडी फॅक्टरी' या नवीन कार्यक्रमाच्या निमित्ताने फराह खान, डॉक्टर संकेत भोसले, सुगंध मिश्रा, पुनीत पथक आणि तेजस्वी प्रकाश हे कलाकार या मंचावर सज्ज झाले. "मला चला हवा येऊ द्या मध्ये येऊन खूप छान वाटलं आणि भरपूर मजा आली. इकडे येऊन वेळ कसा गेला कळलंच नाही. मराठी विनोदी कलाकारांचं कॉमिक टायमिंग हे कमाल असतं आणि हा त्यांचा गुणधर्म आहे असं मला वाटतं." असं म्हणून मंचावरील सर्व विनोदवीरांचं फराह खान यांनी कौतुक केलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : जरांगे पाटील 10 वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईकडे होणार रवाना

Virar Building Collapse : विरारमध्ये चार मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता

Gunaratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्तेंना धमकीचे फोन, मराठा आंदोलकांवर आरोप; “मी कायद्याच्या चौकटीत राहून..."

Latest Marathi News Update live : मीरा रोड येथे इमारतीचा स्लॅब कोसळला