KK Daughter Taamara Team Lokshahi
मनोरंजन

KK Daughter Taamara : 'फादर्स-डे' निमित्त केकेच्या आठवणीत मुलीची भावनिक पोस्ट

प्रसिद्ध गायक केके (KK) यांचे 31 मे रोजी निधन झाले.

Published by : shamal ghanekar

प्रसिद्ध गायक केके (KK) यांचे 31 मे रोजी निधन झाले. केके बॉलिवूडमधील एक सुप्रसिद्ध गायक होते. त्यांनी हिंदीमध्ये 200 हून अधिक गाणी गायली. केके यांच्या मुलीने म्हणजेच तमाराने काल (19 मे) फादर्स-डे निमित्त एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

केके यांची मुलगी तमारा (Taamara) ही सिंगर आहे. 'फादर्स-डे' (Father's Day) निमित्त तमाराने तिच्या इन्स्टाग्राम आकाऊंटवरून केके यांच्यासोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. तमाराने या खास फोटोंना कॅप्शन देताना लिहिले की, 'तुम्ही मला थोड्या वेळ भेटायला आला तर तुम्ही जाण्याचं दु:ख मी सहन करु शकते. तुमच्याशिवाय आयुष्य जगणं कठिण आहे. जगातील सर्वात प्रेमळ वडील तुम्ही होता. मला तुमची खूप आठवण येते. तुमच्यासोबत जेवणे, हसणे, हात पकडणे या सर्व गोष्टींची मला खूप आठवण येते. या जगातील सर्वात बेस्ट वडिलांना माझ्याकडून 'फादर्स-डे'च्या खूप खूप शुभेच्छा.'

'माचीस' (Maachis) या चित्रपटामधील छोड आये हम... या चित्रपटातील गाण्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम दिल चुके सनम' या चित्रपटामधील केके यांनी गायलेल्या गाण्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली आहे. केके यांनी हिंदीबरोबर त्यांनी नऊ भाषांमधील गाणी रेकॉर्ड केली आहेत. केकेंना फिल्मफेयर अवार्ड देऊन गौरवण्यात आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."