मनोरंजन

Subhash Ghai: चित्रपट निर्माते सुभाष घई यांची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल

सुभाष घई यांना हृदयविकाराचा त्रास आणि हायपोथायरॉईडीझमचे निदान झाल्याने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी आवश्यक तपासण्या आणि उपचार सुरू आहेत.

Published by : shweta walge

मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची स्मरणशक्ती कमी होण्याबरोबरच त्यांच्या बोलण्यात अडचण होऊ लागल्याने त्यांना शनिवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुभाष घई यांना शुक्रवारपासून हा त्रास होत होता. त्यांना आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले होते.

लिलावती रुग्णालयामध्ये सुभाष घई यांच्यावर डॉ.रोहित देशपांडे यांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मेंदू, छाती आणि ओटीपोटाचा संदर्भातील काही तपासण्या तसेच आवश्यक रक्त तपासण्या करण्यात आले आहे. मानेच्या अल्ट्रासाऊंडने हायपोइकोइक मार्जिनसह थायरॉइडाइटिसचे निदान केले आहे. तसेच सोमवारी त्यांचे पेट सीटी स्कॅन करण्यात येणार असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. सुभाष घई यांना हृदयविकाराचा त्रास असल्याने २०११ मध्ये त्यांना पेसमेकर बसविण्यात आले होते. तसेच नुकत्याच करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये त्यांना हायपोथायरॉईडीझमचे निदान झाले होते.

सुभाष घई यांनी दिग्दर्शक म्हणून 16 चित्रपट बनवले. त्यापैकी 13 चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर सुपर हीट ठरले.. ‘इकबाल’ चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांनी आपल्या चित्रपटांसह अनेक नवीन कलाकारांना स्टार बनवलं आहे, ज्यात जॅकी श्रॉफ, रीना रॉय, मीनाक्षी, महिमा चौधरी यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा