Akshay & Emran Team Lokshahi
मनोरंजन

Akshay Kumar : अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली; अक्षयचा सेल्फी येतोय प्रेक्षकांच्या भेटीस...

या चित्रपटाला प्रदर्शनाची तारीख मिळाली असल्याचीही माहिती समोर आली आहे.

Published by : prashantpawar1

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि इमरान हाश्मी (Emraan Hashmi) पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. अक्षयने यावर्षी सेल्फी या चित्रपटाची घोषणा केली होती. अक्षय आणि इमरानसोबत या चित्रपटात नुसरत भरुचा आणि डायना पेंटी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाला प्रदर्शनाची तारीख मिळाली असल्याचीही माहिती समोर आली आहे. अक्षय आणि इम्रानला एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांना यावर्षी वाट पाहावी लागणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल माहिती दिली आहे. तरण आदर्शने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सेल्फीच्या रिलीज डेटची पुष्टी केली आहे.

हा चित्रपट 24 फेब्रुवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तरण आदर्श यांनी देखील पोस्ट करत सांगितले की अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी स्टारर सेल्फी हा चित्रपट 24 फेब्रुवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे. हा मल्याळम चित्रपट 'ड्रायव्हिंग लायसन्स'चा अधिकृत रिमेक आहे. ड्रायव्हिंग लायसन्स या मल्याळम चित्रपटाबद्दल सांगायचे तर यात पृथ्वीराज आणि सूरज वेंजरामोधू मुख्य भूमिकेत दिसले होते. आता त्याच चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी धमाल करताना दिसणार आहेत.

राज मेहता या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलताना अक्षय कुमारकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत. त्याचा 'रक्षाबंधन' हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. यानंतर तो 'राम सेतू' , 'ओह माय गॉड २' सह काही चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुंबईला दिवसभर मुसळधार पावसाने झोडपलं

Marathwada Rain Update : मराठवाड्यात पावसाचा कहर; 11 जणांचा बळी, जनजीवन विस्कळीत, पिकांचे प्रचंड नुकसान

Devendra Fadnavis : चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनो रेल पडली बंद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विट करत म्हणाले...

Mono Rail : चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनोरेल बंद पडली; प्रवाशांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू