मनोरंजन

ऋषी कपूर यांच्या शेवटच्या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज

Published by : Lokshahi News

ऋषी कपूर यांचा अखेरचा सिनेमा ठरलेल्या 'शर्माजी नमकीन'चा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. मुख्य म्हणजे ऋषी कपूर यांच्या वाढदिवशीच म्हणजे 4 सप्टेंबर रोजी हा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आहे. ऋषी कपूर यांच्याबद्दलचा आदर आणि प्रेम व्यक्‍त करण्यासाठी आजच्या दिवशी म्हणजे ऋषी कपूर यांच्या वाढदिवशी हा फर्स्ट लुक रिलीज केला गेला आहे. ऋषी कपूर यांची कन्या रिधिमा कपूर हिने देखील या सिनेमाचा फर्स्ट लुक शेअर करून वडिलांना आदरांजली वाहिली आहे. ऋषी कपूर आजारी पडल्यामुळे या सिनेमाचे शूटिंग थांबले होते.

जवळपास दोनवर्षे ऋषी कपूर आजारी होते. मात्र दीर्घ आजारपणातून ते शेवटी बरे होऊ शकलेच नाही. 30 एप्रिल 2020 रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनानंतर 'शर्माजी नमकीन' पूर्ण करण्यासाठी परेश रावळ यांना विनंती केली गेली.

ऋषी कपूर यांचा रोल पुढे सुरू ठेवण्याची तयारी परेश रावल यांनी दर्शवल्यामुळे हा रखडलेला सिनेमा पूर्ण होण्यास मदत झाली. आता निम्म्या भागात ऋषी कपूर आणि निम्म्या भागात परेश रावल आपल्याला दिसणार आहे. 60 वर्षे वयाच्या एका व्यक्‍तीची ही एक खास कहाणी आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा