मनोरंजन

पहिल्यांदाच पंजाबी चित्रपट मराठीत; 'वाळू माफिया'चे पोस्टर प्रदर्शित

Published by : Siddhi Naringrekar

सध्या दाक्षिणात्य चित्रपटांचा मराठी रिमेक करण्याचे फॅड चालू आहे. अनेक गाजलेले दाक्षिणात्य चित्रपट मराठीत प्रदर्शित होत आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांची बॉक्स ऑफिसवरही चलती आहे. आता हा ट्रेंड आणखी एक पाऊल पुढे गेला असून आता पंजाबी चित्रपट मराठीत प्रदर्शित होणार आहे. रनिंग हॉर्सेस फिल्म्स आणि ग्लोबल टायटन्स प्रस्तुत 'वाळू माफिया' हा चित्रपट मराठीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

याव्यतिरिक्त हा चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित होणार आहे. सिमरनजीत सिंग हुंदल लिखित, दिग्दर्शित 'वाळू माफिया' येत्या २८ एप्रिल रोजी तिन्ही भाषेत चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून यात सिंगा, रांझा विक्रम सिंग, सारा गुरपाल, स्वीताज ब्रार, प्रदीप रावत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. चित्रपटाच्या नावावरूनच हा चित्रपट वाळू माफियांवर आधारित आहे, याची कल्पना येते. ॲक्शन आणि ड्रामाने भरलेल्या या चित्रपटाचे उदय सिंग, विक्रम सिंग, शिरीन मोरानी सिंग निर्माते आहेत. तर वितरणाची धुरा फिल्मास्त्र स्टुडिओजचे अमेय खोपकर, अमोल कांगणे आणि प्रणित वायकर यांनी सांभाळली आहे.

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक सिमरनजीत सिंग हुंदल म्हणतात, '' हा एक पंजाबी चित्रपट असला तरी हा मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित व्हावा, असे वाटण्याचे कारण म्हणजे एकतर मराठी प्रेक्षक हे चोखंदळ आहेत. त्यांना विविध विषय पडद्यावर बघायला आवडतात. चित्रपटाचा विषय जरी असा असला तरी यात प्रेमकहाणीही आहे. वाळू माफियांचे विश्व यातून पडद्यावर दाखवणायचा आमचा प्रयत्न आहे. या प्रॅाडक्शन हाऊसचा हा पहिला मराठी डब चित्रपट असला तरीही भविष्यात मराठी चित्रपटांची निर्मिती करण्याची इच्छा उदय सिंग यांनी व्यक्त केली.

कान्समध्ये "हजारवेळा शोले पाहिलेला माणूस" चित्रपटाचा बोलबाला

पाण्यासाठी मराठवाड्यातील शेतकरी आक्रमक; पाटबंधारे कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन

12th HSC Result : बारावीच्या परीक्षेचा आज निकाल; दुपारी 1 वाजता पाहता येणार ऑनलाईन निकाल

निवडणूक आयोगाला फटकारणाऱ्या उद्धव ठाकरेंना उपमुख्यमंत्री फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर, ट्वीटरवर म्हणाले, "त्यांचा पराभव स्पष्टपणे..."

Daily Horoscope 21 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या धन-संपत्तीत होणार बक्कळ वाढ; पाहा तुमचे भविष्य