बिग बॉस सीझन 19 च्या नुकत्याच सुरु झालेल्या सीझनला बरेच दिवस उलटून गेले आहेत. बिग बॉस सीझन 19 24 ऑगस्ट 2025 रोजी सुरू झाला. बिग बॉसचा यंदाचा सीझन हा लोकशाहीचा आहे. दरम्यान या सीझनला एक वेगळच वळण लागलेल आहे. ते म्हणजे, बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच घरातील सर्व सदस्य एकाच वेळी नॉमिनेट झाले आहेत. बिग बॉस सीझन 19 मध्ये नतालिया आणि नगमा हे दोन स्पर्धक एव्हिक्ट झाले. बिग बॉसच्या घरात नवीन आठवडा सुरु झाला आहे.
बिग बॉसच्या नियमांनुसार नवीन आठवड्याला घरात नॉमिनेशनची प्रक्रिया सुरु होते, त्याचप्रमाणे बिग बॉस 19 मध्ये देखील ही प्रक्रिया सुरु झाली होती. मात्र ही प्रक्रिया सुरु होण्याआधीच बिग बॉसच्या घरात उघडपणे नॉमिनेशनची चर्चा करण्यात आली. अशा प्रकरे सर्वात मोठ्या नियमाचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न सदस्यांकडून करण्यात आला. ज्यामुळे नॉमिनेशन प्रक्रियेआधीच बिग बॉसच्या घरात सर्व सदस्यांना नॉमिनेट करण्यात आले.
दरम्यान यात अमाल मलिक हा थोडक्यात बचावला, कारण तो घरातील कॅप्टन असल्यामुळे त्याला नॉमिनेट करण शक्य नव्हते, ज्यामुळे घरातील इतर सदस्यांना वॉर्निंग दिल्यानंतर काही टास्क पुर्ण करुन घेतले गेले, ज्यामध्ये घरातील 5 सदस्य नॉमिनेट झाले. यामध्ये नेहल चुडासमा, अशनूर कौर, बसीर अली, अभिषेक बजाज आणि प्रणित मोरे या सदस्यांची नावे आहेत.
या सगळ्यांसाठी ठेवण्यात आलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये घरातील सदस्यांना कोणाला नॉमिनेशनची नावं न घेता तुम्हाला कोणत्याही दोन सदस्यांना वाचवायचं आहे. त्यानुसार, घरातील सदस्यांनी कन्फेशन रुममध्ये आपल्या खास सदस्यांची नावं सांगून कारणं दिली. आता या आठवड्यात कोण एव्हिक्ट होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच आता घराबाहेर कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.