Four More Shots Please 3 Team Lokshahi
मनोरंजन

Four More Shots Please 3: 'फोर मोअर शॉट्स प्लीज ३'च्या तिसऱ्या सीझनची घोषणा

मैत्री आणि रोमान्सने भरलेला हा शो 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Published by : shweta walge

'फोर मोअर शॉट्स प्लीज' या ड्रामा, मैत्री आणि रोमान्सने परिपूर्ण असलेल्या वेब सीरिजचा तिसरा सीझन याच महिन्यात रिलीज होणार आहे. या शोमध्ये आपल्याला पुन्हा एकदा सयानी गुप्ता, कीर्ती कुल्हारी, बानी जे आणि मानवी गाग्रू यांच्यातील मैत्रीचे नवे रूप पाहायला मिळणार आहे. 'फोर मोअर शॉट्स प्लीज सीझन 3' च्या निर्मात्यांनी शोच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे. हा शो या महिन्याच्या २१ तारखेला रिलीज होणार आहे. गेल्या दोन सीझनला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. अशा परिस्थितीत प्रेक्षक त्याच्या नव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. शोची कथा तिथून पुढे चालू राहील जिथे तिचा दुसरा सीझन संपला.

बोल्ड कंटेंटमुळे हा शो हिट झाला होता

फोर मोअर शॉट्स प्लीजचे दोन्ही सीझन त्यांच्या बोल्ड कंटेंटमुळे खूप चर्चेत आले. पहिल्या सीझनचा प्रीमियर 2019 मध्ये झाला आणि दुसरा 2020 मध्ये आला. या शोच्या बोल्ड सीनबद्दल प्रेक्षकांच्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या. सध्या ही सीरिज पुन्हा एकदा आपला नवा सीझन घेऊन येत आहे.

ही वेब सिरीज चार महिलांची गोष्ट आहे, ज्यांची मैत्री खूप अतूट आहे. चांगल्या-वाईट काळात ते एकमेकांची साथ सोडत नाहीत. या चार मुलींना आपलं आयुष्य आपापल्या परीने जगायचं आहे.

सयानी गुप्ता, बानी जे, कीर्ती कुल्हारी आणि मानवी गाग्रू यांच्याशिवाय इतर नवे चेहरे नव्या सीझनमध्ये दिसणार आहेत. ज्यामध्ये जिम सरभ, रोहन मेहरा आणि सुशांत सिंग दिसणार आहेत. देविका भगत लिखित, जोयिता पटपटिया दिग्दर्शित या मालिकेची निर्मिती प्रितिश नंदी कम्युनिकेशनने केली आहे. फोर मोअर शॉट्स प्लीजचा तिसरा सीझन २१ ऑक्टोबर २०२२ पासून प्रीमियर होईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा