karanvir bohra, tajinder-sidhu  Team Lokshahi
मनोरंजन

Karanvir Bohara: करणवीर बोहराआणि त्याची पत्नी तजिंदर सिध्दूविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता करणवीर बोहरा आणि त्याची पत्नी तजिंदर सिद्धू यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published by : shweta walge

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता करणवीर बोहरा (Karanveer Bohra) आणि त्याची पत्नी तजिंदर सिद्धू (Tajinder Sidhu) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा (Fraud case filed) दाखल करण्यात आला आहे. ANI वृत्तसंस्थेनुसार, अभिनेता ​​करणवीर बोहरा याच्यासह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका ४० वर्षीय महिलेने आरोप केला आहे की, त्याने तिच्याकडून १.९९ कोटी व्याजावर घेतले आणि ते २.५ टक्के व्याजासह परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र आतापर्यंत त्यांना केवळ एक कोटी रुपये परत करण्यात आले आहेत.

ओशिवरा पोलिस ठाण्यातून (Oshiwara Police Station) मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने दावा केला की, जेव्हा तिने रक्कम मागितली तेव्हा बोहरा आणि त्याची पत्नी तजिंदर सिद्धू यांनी योग्य प्रतिसाद दिला नाही आणि तिला गोळ्या घालण्याची धमकी दिली. पोलिसांनी तपास सुरू केला असून लवकरच त्यांचा जबाब नोंदवला जाईल.

पोलिस लवकरच करणवीर आणि त्याची पत्नी तजिंदरला चौकशीसाठी बोलावू शकतात, असे सांगण्यात येत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा