मनोरंजन

'याच्या रिक्षाच्या हॉर्नमधनं, आली वाघाची डरकाळी', रिल्समध्ये पहा पुष्कर-कृतिकाचा 'कूल' अंदाज

मराठीसह बॉलिवुडमध्येही आपल्या अभिनयाचा दमदार ठसा उमटवणारे नाव म्हणजे पुष्कर जोग

Published by : shweta walge

मुंबई, 27 जुलै, 2022: मराठीसह बॉलिवुडमध्येही आपल्या अभिनयाचा दमदार ठसा उमटवणारे नाव म्हणजे पुष्कर जोग (Pushkar Jog) . हटके भूमिकांमुळे पुष्कर अल्पावधीतच रसिकांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. 'जबरदस्त', 'धूम 2 धमाल', सत्य, सासूचं स्वयंवर अशा मराठी सिनेमांसह 'जाना पहेचाना', 'इएमआय' अशा हिंदी सिनेमांमधून पुष्करने मराठी प्रेक्षकांच्याही मनात स्थान मिळवले आहे.

पुष्कर सोशल मीडियावरही कायम सक्रीय असतो. त्याने वैयक्तिक आयुष्यासह आगामी चित्रपटांबद्दल केलेल्या पोस्ट्सनाही चाहते कायमच उचलून धरतात. सध्या पुष्करने केलेली एक मस्त मजेदार रील चर्चेत आहे. यात तो सध्या गाजणाऱ्या एका मराठी गाण्यावर थिरकताना दिसतो आहे.

या रिलमध्ये पुष्करचा अतिशय कूल अंदाज बघायला मिळतो आहे. 'याच्या रिक्षाच्या हॉर्नमधनं, आली वाघाची डरकाळी...' हे या आगामी सिनेमातले गाणे सध्या गाजते आहे. याच गाण्यावर ही छोटीशी रील पुष्करने केली आहे. यात पुष्करसोबत अभिनेत्री कृतिका गायकवाडसुद्धा (Krutika Gaikwad) एकदम जोशात ठुमके लावते आहे.

आगामी 'टाइमपास' सिनेमातील हे गाणे सध्या लोकांच्या ओठांवर चांगलेच रुळले आहे. लोकप्रिय गायिका वैशाली सामंतने ठसक्यात गायलेले हे गाणे क्षितीज पटवर्धनने लिहिले आहे. अमितराज यांच्या संगीताने हे गाणे सजले आहे. या गाण्यात आपल्या वेगवान आणि मोहक अदांनी कृतिका गायकवाड मुग्ध करते आहे. तिच्यासोबत प्रथमेश परब यानेही पुरेपुर धमाल आणली आहे.

दिग्दर्शक रवी जाधव यांचा हा सिनेमा टाइमपास 3 येत्या 29 जुलैपासून रसिकांच्या भेटीला येतो आहे. प्रथमेश परब आणि ह्रता दुर्गुळे ही जोडी यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसामुळे 366 रस्ते बंद, 929 ठिकाणी वीजपुरवठा खंडित

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट