मनोरंजन

‘गंगुबाई काठियावाडी’ची बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला!

Published by : Team Lokshahi

गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी केले आहे. गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट शुक्रवारी (25 फेब्रुवारी) प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) ही गंगूबाई काठियावाडी मुख्य भूमिका साकारत असून तिच्याबरोबर शांतनु (Shantanu Maheshwari),अजय देवगण (Ajay Devgan), विजय राज (Vijay Raj), सीमा पाहवा (Seema Pahwa) हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशी कोट्यवधींची कमाई केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोयं.

गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर (Box office) दहा कोटी कमाई केली. संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाने शुक्रवारी 10.5 कोटींचा व्यवसाय केला. त्यानुसार बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे भविष्य चांगले दिसत आहे. इतकंच नाही, तर बॉक्स ऑफिसवर 'गंगूबाई'समोर 'वालीमाई' आणि 'भीमला नायक' हे चित्रपटही टक्कर देत आहेत, तरीही चित्रपटाची कमाई जोरदार दिसत आहे. 'गंगूबाई काठियावाडी'ने पहिल्या वीकेंडमध्ये 39.12 कोटींचा व्यवसाय केला होता. तर, सोमवारी या चित्रपटाने 8 कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे चित्रपटाची एकूण कमाई 4 दिवसात 47.12 कोटींवर गेली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा