सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना लक्ष्य करणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीसह अनेक अभिनेत्रींची नावे घेत आरोप केले होते. यावरच आता अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं पत्रकार परिषद घेत या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलंय. यावेळी तिने सुरेश धस यांनी माझी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. याचपार्श्वभूमीवर लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील बदलापूरच्या आगरी महोत्सवात परफॉर्मन्ससाठी आली होती. यानंतर माध्यमांशी बोलताना तिनं ही प्रतिक्रिया दिली आहे.
'प्राजक्ताताई, तू ट्रोलिंगकडे लक्ष देऊ नको!' काय म्हणाली गौतमी पाटील
'कलाकार हा कलाकार असतो'. त्याचं नाव कुणासोबत जोडून त्याची बदनामी करणं चुकीचं आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतलेली भूमिका योग्य असून आपण तिच्या भूमिकेचं समर्थन करतो', अशी प्रतिक्रिया नृत्यांगना गौतमी पाटीलने दिली आहे. पुढे गौतमी पाटील म्हणाली की,आम्ही सर्व कलाकार तुझ्यासोबत आहोत यासर्व गोष्टींना ट्रोल जरी केल तरी तू अजिबाद लक्ष देऊ नकोस.... कलाकाराला कलाकारासोबतच राहूद्या कोणत्याही नेत्यासोबतच नाही म्हणत मी, पण त्याच नाव कोणासाोबत ही जोडू नका.... एका कलाकाराच दु:ख हे त्या कलाकाराचं माहित असत, कोणाच नाव कोणासोबत जोडू नका.... जसं तुम्ही आमच्यावर, कलाकारांवर प्रेम करता ते तसचं राहुद्या आणि कलाकाराच्या सोबत राहा तुम्ही... मलाही याआधी अशाच प्रकारे ट्रोल केलं गेलं होतं. मात्र मी खचून गेली नाही. त्यामुळे प्राजक्ता ताईनेही खंबीरपणे उभं राहून आपली कला सादर करत राहावी, आणि हसत राहावं, असं गौतमीनं म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले सुरेश धस?
सुरेश धस यांनी काल (27 डिसेंबर) घेतलेल्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले होत की, आम्ही बघत असतो रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी, सपना चौधरी यांचे जे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्यांचा जवळचा पत्ता परळी पॅटर्नकडे आहे. धनुभाऊ आपले विमान खाली आणा. तुम्हाला पालकमंत्री व्हायचे आहे. आमचा लेकरू मेले त्याला न्याय द्यायचा. तुला कोणी घेरले आहे..? हा काही राजकीय विषय नाही, असं विधान सुरेश धस यांनी केलं होतं. सुरेश धस यांच्या या विधानानंतर प्राजक्ता माळी याविरोधात महिला आयोगात तक्रार करणार असल्याचं बोललं जात आहे.