Genelia D'Souza Team Lokshahi
मनोरंजन

जेनेलियाची मराठी चित्रपट सृष्टीत दमदार एन्ट्री

अभिनेत्री जेनेलिया डिसूजा हि तब्बल पाच भाषिक चित्रपटात काम केले आहे. एवढ्या पुरतेच मर्यादित न राहता ती आता रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

Published by : shamal ghanekar

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूजा या क्युट कपल ने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटात काम करून आपले स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्री जेनेलिया डिसूजा हिने हिंदी तेलगू तामिळ कन्नड आणि मल्याळम अशा तब्ब्ल पाच भाषिक चित्रपटात काम केले आहे. एवढ्या पुरतेच मर्यादित न राहता जिनिलियाने लय भारीच्या चित्रपटाच्या निम्मिताने मराठी गाण्यामध्ये ती झळकली होती. ती आता रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. जिनिलियाचा हा मुख्य भूमिकेतील पहिलाच मराठी चित्रपट असणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे.

जिनिलिया सोबतच रितेश देशमुख हि या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे या दोघांची जोडी चित्रपट पडद्यावर काय कमाल करते हे पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता दिसते. रितेश देशमुखने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट वरून वेड या आगामी चित्रपटाचा पोस्टर लॉन्च केला आहे. पोस्टरवरून हा चित्रपट प्रेम कहाणी आणि थ्रिलर या चौकटीत बसणार असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या चित्रपटाच्या फर्स्ट लुक ला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.

लय भारी मध्ये अभिनेता सलमान खान आपल्याला छोट्याशा भूमिकेत दिसला होता. तो आता पुन्हा वेड चित्रपटाच्या निम्मिताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमानचे या चित्रपटात काय कॅरॅक्टर असणार आहे हे पाहण्यासाठी सलमानचे चाहते सुद्धा उत्सुक आहेत. जिनिलिया रितेशचा हा वेड चित्रपट ३० डिसेंबर रोजी चित्रपटात झळकणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."