मनोरंजन

"गेट टूगेदर' चित्रपटातील "आभास की भास" या रोमँटिक गाण्याला जावेद अली, प्रियांका बर्वे यांचा स्वरसाज

'आभास की भास की तुझा हा श्वास गं' असे शब्द असलेलं गेट टूगेदर या चित्रपटातलं रोमँटिंग गाणं अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लाँच करण्यात आलं.

Published by : Siddhi Naringrekar

'आभास की भास की तुझा हा श्वास गं' असे शब्द असलेलं गेट टूगेदर या चित्रपटातलं रोमँटिंग गाणं अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लाँच करण्यात आलं. अतिशय श्रवणीय संगीत, जावेद अली,  प्रियांका बर्वे यांचा आवाज या गाण्याला लाभला असून, उत्तम पद्धतीनं हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. येत्या १९ मे ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे

सतनाम फिल्म्स प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती  समीर गोंजारी, संजय गोंजारी, आशिष धोत्रे यांनी केली आहे. चित्रपटाचं पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलं आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. तर एकनाथ गिते, त्रिशा कमलाकर, श्रेया पासलकर, इमरान तांबोळी, संजना काळे, मिताली कोळी, सुशांत कोळी, साकिब शेख आदींच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. 

काही दिवसांपूर्वीच गेट टुगेदर या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला होता. तर आता पहिलं गाणं लाँच करण्यात आलं आहे. शालेय किंवा कॉलेज जीवनात एखाद्या मुलावर किंवा मुलीवर प्रेम असतं. पण काही ना काही कारणानं ते प्रेम यशस्वी होत नाही. या पहिल्या प्रेमाची पुन्हा आठवण करून देण्याचा प्रयत्न "गेट टुगेदर" या चित्रपटात करण्यात आला आहे. 

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा