Watch movies for just Rs.99  
मनोरंजन

Cinema Lovers Day 2023 : गूडन्यूज! 'या' दिवशी फक्त 99 रुपयांत पाहता येणार चित्रपट

चित्रपट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 20 जानेवारी या दिवशी भारतातील काही निवडक शहरांमध्ये सिनेमा लव्हर्स डे साजरा करण्यात येणार आहे.

Published by : Pankaj Prabhakar Rane

चित्रपट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 20 जानेवारी या दिवशी भारतातील काही निवडक शहरांमध्ये सिनेमा लव्हर्स डे साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे 20 जानेवारी रोजी सिनेमागृहात चित्रपट अत्यंत कमी किमतीत पाहायला मिळणार आहे. या दिवशी चित्रपटांचे तिकीट हे फक्त 99 रुपये इतके असणार आहेत. त्यामुळे आपल्या आवडत्या चित्रपटांचा आस्वाद प्रेक्षकांना 99 रुपयांत घेता येणार आहे.

नुकतेच प्रदर्शित झालेले मराठी, हिंदीसह इतर चित्रपट हे 20 जानेवारी रोजी 99 रुपयांत पाहायला मिळणार आहे. मराठीत वाळवी, वेड हे चित्रपट 99 रुपयांत पाहता येतील. शिवाय या चित्रपटांच्या निर्मात्यांनी देखील अशी घोषणा केली आहे. तर 20 जानेवारी पासून वेड या ब्लॉकबस्टर ठरलेल्या चित्रपटाचं वाढीव वर्जन प्रदर्शित होत असून त्यात नवं गाणं आणि 3 नवे सीन्स असलेली चित्रपटाची नवी आवृत्ती प्रदर्शित होत आहे. तर वाळवी या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

तर हिंदीत नुकताच प्रदर्शित झालेला कुत्ते चित्रपट 99 रुपयात पाहता येईल. याशिवाय महागडं तिकीट असलेला अवतार 2 हा चित्रपट थ्रिडी स्वरुपात 99 रुपयात पाहता येणार आहे. याच दिवशी द कश्मिर फाईल्स हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत असून तोही 99 रुपयात पाहता येईल.मागील वर्षी देखील पीवीआर, आईनॉक्स, कार्निवल, सिनेपॉलिस, मिराज, डिलाइट या चित्रपट कंपन्यांनी Cinema Lovers Day निमित्ताने तिकीटाचे दर कमी किंमतीचे ठेवण्यात आले होते. मागील वर्षी सिनेमा लव्हर्स डे साजरा करण्यासाठी चित्रपटाच्या तिकीटाचे दर फक्त 75 रुपये ठेवण्यात आले होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा