बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या खासगी आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहे. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांच्या नात्यामध्ये कटुता आल्याचे दिसून येत असून 37 वर्षाचा संसार मोडणार असल्याची चर्चा सुरु आहे. सुनीता आणि गोविंदा गेले अनेक वर्ष एकमेकांपासून वेगवेगळे राहत आहेत. याची माहिती सुनीताने स्वत: मुलाखतीदरम्यान दिली होती. नुकताच गोविंदाच्या मुलगा यशवर्धन आहुजाचा वाढदिवस पार पडला. त्याच्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. घरातील सर्व सदस्यांची उपस्थिती पाहायला मिळली मात्र या पार्टीमध्ये गोविंदा कुठेही दिसला नाही. त्यामुळे सुनीता आणि गोविंदाच्या घटस्फोटाच्या चर्चा अधिकच रंगल्या आहेत.
गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजाचा वाढदिवस 1 मार्च रोजी झाला. त्याच्या वाढदिवसाचे काही फोटो समोर आले. या फोटोमध्ये यशवर्धन त्याची आई आणि बहीणीसोबत केक कट करताना दिसत आहे. या पार्टीमध्ये गोविंदा मात्र कुठेच दिसला नाही. वाढदिवसांच्या पार्टीमध्ये गोविंदा नसल्याने सुनीता आणि त्याच्या नात्यामधल्या दुराव्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
काहीदिवसांपूर्वी सुनीताने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिने गोविंदाबरोबरच्या नात्याबद्दल एक खुलासा केला. सुनीता म्हणाली की, "मला सध्या खूप असुरक्षित वाटते. वयाच्या 60 व्या वर्षांनंतरही लोक बदलतात. तो काय करत आहे हे मला माहीत आहे". असे सुनीता म्हणाल्या.
घटस्फोटाबद्दल गोविंदाला विचारले असता तो म्हणाला की,
"मी याबद्दल सुनीताला मेसेज केला आहे. पण तिने अद्याप रिप्लाय दिला नाही". मात्र त्याने त्याच्या व्यवसायाबद्दल चर्चा केली. तो म्हणाला की, "सध्या फक्त बिजनेसबद्दलच्या चर्चा सुरु आहेत. मी माझे नवीन चित्रपट तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये आहे" असे गोविंदाने म्हटले आहे.