मनोरंजन

गुरमीत चौधरी-देबिना बॅनर्जी यांनी आपल्या नवजात बाळाचे स्वागत अनोख्या अंदाजात करून चाहत्यांना दिली गोड बातमी

गुरमीत चौधरी-देबिना बॅनर्जी यांनी शुक्रवारी आपल्या सोशल मिडियावर नुकत्याच आपल्या जन्मलेल्या मुलीचे स्वागत करतानाची पोस्ट वायरल केली. ठरलेल्या तारखे आधीच बाळाचा जन्म झाला, असा त्यांनी त्या पोस्ट मध्ये उल्लेख केला आहे.

Published by : Team Lokshahi

गुरमीत चौधरी-देबिना बॅनर्जी यांनी शुक्रवारी आपल्या सोशल मिडियावर नुकत्याच आपल्या जन्मलेल्या मुलीचे स्वागत करतानाची पोस्ट वायरल केली. ठरलेल्या तारखे आधीच बाळाचा जन्म झाला, असा त्यांनी त्या पोस्ट मध्ये उल्लेख केला आहे.

“आमच्या मुलीचे जगात स्वागत आहे. आम्ही पुन्हा पालकझालो आहोत म्हणून आनंदी आहोत, आमचे बाळ वेळेपेक्षा लवकर जगात आले आहे म्हणून आम्ही यावेळी काही गोपनीयतेची प्रशंसा करतो. आशीर्वाद देत राहा आणि तुमच्या अखंड प्रेमाचा वर्षाव करत राहा 💕🙏”असे म्हणत गुरमीत आणि देबिना ने आपला आनंद व्यक्त केला.

गुरमीत आणि देबिनाने ऑगस्ट महिन्यामध्ये गरोदरपणाची कबुली दिली. याच वर्षाच्या सुरुवातीला, या दोघांनी एप्रिल 2022 मध्ये त्यांच्या पहिल्या आपत्त्याचे,म्हणजेच आपल्या पहिल्या मुलीचे 'लियानाचे' स्वागत केले. या जोडप्याने तिच्या दुसर्‍या गरोदरपणाची घोषणा Instagram वर केली आणि असे लिहिले, “काही निर्णय दैवीपणे वेळेवर घेतले जातात आणि काहीही बदलू शकत नाही… हा असाच एक आशीर्वाद आहे.''

पिंकविलासोबतच्या आधीच्या मुलाखतीत गुरमीत अस म्हणाला होता कि, “आम्ही धन्य आहोत की आम्ही पुन्हा आई-वडील होणार आहोत कारण माझा मोठा भाऊ माझ्यापेक्षा फक्त अकरा महिन्यांनी मोठा आहे. हम भी एकदम बॅक टू बॅक आहे. आणि मला नेहमी वाटायचं की माझा भाऊ माझा मित्र आहे. त्यामुळे देबिना आणि मी नेहमी काम आणि शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने, मोठे होत असताना लियानाला एक भाऊ किंवा मित्र असावा. त्यामुळे हीच योग्य वेळ होती. हम दो हमारे दो होने चाहिये,''. आता याच गोड बातमीनंतर दोघांवर भरगोस शेभेछ्यांचा वर्षाव होते आहे. चाहते आता दोघंच्या गोड मुलीला पाहण्यसाठी आतुर झाले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा