मनोरंजन

या अभिनेत्याने CPR देऊन रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीचे वाचवले प्राण, व्हिडीओ व्हायरल

गुरमीत चौधरी चाहत्यांच्या नजरेत खरा हिरो बनला आहे. गुरमीत चौधरीने रस्त्याच्या कडेला एका अज्ञात व्यक्तीचा जीव वाचवला आहे.

Published by : shweta walge

टीव्ही अभिनेता गुरमीत बऱ्याच काळापासून छोट्या पडद्यापासून दूर आहे, पण तो नेहमी सोशल मीडियावर सक्रिय राहतो. चाहते त्याच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक करत असतात. मात्र आता गुरमीत चौधरी चाहत्यांच्या नजरेत खरा हिरो बनला आहे. गुरमीत चौधरीने रस्त्याच्या कडेला एका अज्ञात व्यक्तीचा जीव वाचवला आहे. अभिनेत्याची ही शैली पाहून चाहते खूप खूश झाले असून आता सोशल मीडियावर त्याचे कौतुक होत आहे.

गुरमीत चौधरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला जमिनीवर पडून आहे. अशावेळी गुरमीत पुढे येतो आणि त्याला CPR देतो. या प्रसंगी अभिनेता इतर लोकांनाही त्या व्यक्तीला मदत करण्यास सांगतो. गुरमीतला असे पाहून तेथे लोकांची गर्दी जमते. यानंतर सर्वजण अभिनेत्याचे आभार मानताना दिसत आहेत. गुरमीतचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहणाऱ्या लोकांनी अभिनेत्याला खरा हिरो म्हटले आहे. एका यूजरने लिहिले की, 'तुझ्याबद्दलचा आदर आणखी वाढला आहे.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'रियल हिरो गुरमीत पाजी.' त्याचप्रमाणे दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, 'तुम्ही खरोखरच भगवान राम आहात.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा