मनोरंजन

आशा भोसले यांचा शास्त्रीय चित्रपट गाण्यापासून पॉप गाण्यापर्यंतचा प्रवास

Published by : Lokshahi News

आशा भोसले यांनी आपल्या करियरची सुरूवात 1943 साली केली. आशाजी यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे झाला त्यांचे वडील दिनानाथ मंगेशकर हे एक शास्त्रीय गायक आणि संगितकार होते. आशाजी 9 वर्षाच्या असतांना त्यांच्या वडीलांचा ह्नदयविकाराने मृत्यु झाला.

आशाजींनी पहिले गाणे 'माझा बाळ' या चित्रपटाकरता गायले होते. त्यांचे पहिले हिन्दी गाणे 1948 साली चुनरिया या चित्रपटाकरता 'सावन आया' हे होते. त्यांच्या नावे 12000 पेक्षा जास्त गाण्यांचा विक्रम आहे. त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड मध्ये समाविष्ट झाले आहे, त्यांनी 20 भारतीय आणि 12 विदेशी भाषांमध्ये गायन केलं आहे.भारत सरकारने आशाजींच्या या विक्रमासाठी त्यांना 2000 साली 'दादासाहेब फाळके' पुरस्कार आणि 2008 मध्ये पद्म विभुषण अवार्ड देऊन सन्मानित केले आहे. 2013 साली मराठी चित्रपट 'माई' मध्ये प्रथमच त्यांनी चित्रपटांत अभिनय केला.

व्यक्तिगत जीवन –

आशाजींनी वयाच्या 16 व्या वर्षी 31 वर्षीय प्रियकर 'गणपतराव भोसले' जे लताजींचे मॅनेजर होते त्यांच्याशी पळुन जाऊन विवाह केला. 1960 नंतर आशाजींनी आपल्या परिवाराकरता परत गायनावर लक्ष केंद्रित केले.1980 साली प्रसिध्द संगितकार "राहुलदेव बर्मन" यांच्यासोबत त्यांनी विवाह केला. राहुल देव बर्मन यांच्यासोबत त्या त्यांच्या मृत्युपर्यंत सोबत होत्या.

अवार्ड

फिल्म फेयर अवार्ड

आशा भोसले यांना एकुण 18 नॉमिनेशनस् पैकी 7 फिल्म फेयर अवार्ड मिळाले आहेत, त्यांनी आपले पहिले अवार्ड 1967 मधे मिळवले होते.

फिल्म फेयर बेस्ट प्लेबॅक अवार्ड

● 1968 'गरिबो की सुनो' हे गित दस लाख या चित्रपटातील (1966)
● 1969 मध्ये 'परदे मे रहने दो' या गितासाठी चित्रपट 'शिखर' (1968)
● 1972 'पिया तु अब तो आजा' या गितासाठी चित्रपट 'कारवा' (1971)
● 1973 'दम मारो दम' या गितासाठी चित्रपट 'हरे रामा हरे क्रिष्ना' (1972)
● 1974 'होने लगी है रात' या गितासाठी चित्रपट 'नैना' (1973)
● 1975 'चैनसे हमको कभी' या गितासाठी चित्रपट 'प्राण जाये पर वचन न जाये' (1974)
● 1979 'ये मेरा दिल' या गितासाठी चित्रपट 'डॉन' (1978)

राष्ट्रीय फिल्म फेयर अवार्ड

● आशाजींनी 2 वेळा राष्ट्रीय फिल्म फेयर अवार्ड बेस्ट प्लेबॅक सिंगर साठी जिंकले आहे.
● 1981 'दिल चीज क्या है' या गितासाठी चित्रपट उमराव जान.
● 1986 'मेरा कुछ सामान' या गितासाठी चित्रपट इजाजत.
● IIFA अवार्ड बेस्ट फिमेल प्लेबॅक साठी
● 2002 बेस्ट फिमेल प्लेबॅकसाठी लाईफ टाईम अचीव्हमेंट अवार्ड.
● 2001 फिल्म फेयर लाइफटाइम अचिवमेंट अवार्ड.
● 1987 नाईटेंगल आॅफ एशिया अवार्ड
● 1989 लता मंगेशकर अवार्ड (मध्यप्रदेश सरकार)
● 1997 स्क्रीन व्हिडीयोकाॅन अवार्ड (जानम समझा करो – अल्बम)
● 1998 दयावती मोदी अवार्ड (गुजरात सरकार)
● लता मंगेशकर अवार्ड (महाराष्ट्र सरकार)
● 2000 सिंग ऑफ दी मिलीनीयम अवार्ड (दुबई)
● 2001 एम.टि.व्ही. अवार्ड (कम्ब्ख्त इश्क या गितासाठी)
● 2002 बी.बी.सी. लाइफटाईम अचीव्हमेंट अवार्ड (इंग्लंडच्या पंतप्रधानांव्दारे सन्मानित)
● 2004 लाईविंग लिजंड अवार्ड
● 2005 मोस्ट स्टाईलीश पिपल इन म्युझीक अवार्ड

सन्मान

● 1997 मधे आशाजी "ग्रेमी अवार्ड" करता नामांकित होणाऱ्या पहिल्या भारतीय गायिका बनल्या
● भारतीय सिनेमात उत्कृष्ट योगदानासाठी सन् 2000 मधे "दादा साहेब फाळके अवार्ड" प्राप्त केला.
● भारत सरकारने त्यांना "पद्म विभुषण" पुरस्काराने सन्मानित केले आहे.
● 2020 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test