मनोरंजन

Hardik-Akshaya : हार्दिक-अक्षयाची लंडन ट्रिप

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांची लग्नापुर्वीची लंडन ट्रिप ठरली सोशल मिडीयावर चर्चेचा विषय

Published by : Shweta Shigvan-Kavankar

तुझ्यात जीव रंगला मालिकेतुन घराघरात पोहचलेली राणादा-पाठकबाइची जोडी ही अनेक लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे.त्यांच्या मैत्रीची चर्चा अनेकदा सोशल मिडीयावर रंगल्या होत्या. पण या दोघांनी मे महिन्यातच साखरपुडा करुन चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. अक्षया-हार्दिक च्या साखरपुड्याला अनेक दिग्गज कलाकार मंडळींनी देखील हजेरी लावली होती.

आता लग्नाआधीच अक्षया-हार्दिक लंडनला गेल्याची माहिती त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे फोटो व व्हिडीओ शेअर करत दिली आहे. हार्दिक ने अक्षया सोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत हॅशटॅग लंडन असे कॅप्शन दिले आहे.

अक्षया-हार्दिक सध्या लंडनमधील वेगवेगळ्या ठिकाणी फिरुन सुट्टयांचा आनंद घेताना दिसत आहेत. अक्षया-हार्दिक लंडनवरुन परतल्यावर त्यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात करणार आहेत. पुण्यामध्येच विवाह संपन्न होण्याच्या चर्चा आहेत.तसेच या विवाह सोहळ्यात कोण कोण हजेरी लावणार आहेत? अक्षया-हार्दिक चा लुक कसा असेल? हे काही दिवसातच आपल्याला कळेल . अक्षया हार्दिकने त्यांच्या नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली